सावधान, गंजवार्ड भाजी मार्केटमध्ये ग्राहकांची शंभर, दीडशे ग्रॅमनी होतो फसवणूक वैद्य मापन शास्त्र विभाग कारवाई करेल का ?



सावधान, गंजवार्ड भाजी मार्केटमध्ये ग्राहकांची शंभर, दीडशे ग्रॅमनी होतो फसवणूक

वैद्य मापन शास्त्र विभाग कारवाई करेल का ?

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर:-

येथील गंजवार्ड हा भाजी मार्केट साठी प्रसिद्ध असून या ठिकाणी चिल्लर भाजी विक्रेते व्यवसाय करतात. या भाजी मार्केटमध्ये किलो काटे( तराजू) यामध्ये  सर्रास 100 ग्राम वजन कमी करून ग्राहकाच्या माती  भाजीपाला  मारतात.

    या भाजी मार्केटमध्ये सर्रास एक महिला  तिच्या काट्यात सत्तर ग्राम ते 80 ग्राम पारड ठेवल्यावरही  वजन दिसत असताना डोळ्या देखत ग्राहकाची  शंभर ते दीडशे ग्रॅमनी फसवणूक करताना दिसत आहे. उलट ग्राहकांनाशी  उद्धट भाषेत  तुम्ही कोण आमदार ,खासदार आहात का? आमचा फोटो काढून का करणार आहे. सर्व मार्केटच  काटा मारत असतो. तुम्ही महिलांना धमकू शकत नाही. अशा  अवच्य  भाषेत ती ग्राहकाशी  भांडत असून सर्रास भाजी मार्केटमध्ये   ग्राहकांची लुबाडणूक  होत आहे. 

पहिलेच महागाईने सर्वसाधारण माणूस हतबल झाला आहे. वरून या भाजी मार्केटमध्ये   गरीबाच्या खिशाला कात्री लावण्याचे काम येथील  भाजीविक्रेते  सर्रास करीत आहेत.

असाच प्रकार  दैनंदिन सुरू असून याकडे वैद्य मापन निरीक्षक या कार्यालयाचे दुर्लक्ष असून वजन माप कार्यालय हे  शोभेचे वस्तू झाले आहेत की काय? असा प्रश्न आता सामान्य माणसाला पडू लागला आहे.

 या भाजी मार्केटमध्ये आतापर्यंत कुठल्याही वजन माप कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या संबंधित वजन माप काट्यावर तपावत असताना कारवाई  करताना दिसून आले नाही. संबंधित विभागाने  या  भाजी मार्केटमध्ये  होत असलेल्या वजन माप  काट्यांवर कारवाई करावी.  होत असलेल्या गोरगरिबाच्या फसवणुकीला आळा बसवावा अशी मागणी होत आहे.