चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना (उबाठा) ताकतीने निवडणूक लढणार - संदीप गि-हे
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर महानगरपालिकेत येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पूर्ण ताकतीने जोमाने उमेदवार उभे करणार आहे. मनपा हद्दीतील स्थानिकांचे प्रश्न, जनतेच्या अडचणी, व विकास कामाच्या मुद्द्यावर निवडणुकीच्या माध्यमातून नागरिकाच्या पाठीशी उभे राहण्याचा उद्देश असल्याचे आज पत्रकार परिषदेतून शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष संदीप गि-हे यांनी पत्रकार परिषदेतून आव्हान केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख शालिक फाले, महानगर प्रमुख सुरेश पचारे माजी जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे, विधानसभा प्रमुख प्रमोद पाटील, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, माजी तालुकाप्रमुख संतोष नरुले, विनय बोधे, उपशहर प्रमुख प्रमोद कालोटकर, राहुल भोयर, अरमान शेख, सिकंदर खान, राहुल विरुटकर, वसीम खान, सुरज घोंगे गिरीश कटारे, सुचित पिंपळशेंडे, भूपेंद्र लोढिया यांची उपस्थिती होती.
शिवसेना नेहमीच सामान्य नागरिकाच्या प्रश्नासाठी झटत आली असून चंद्रपूर महानगरपालिकेत भ्रष्टाचार, अकार्यक्षमता स्थानिक जनतेच्या हिताकडे होत असलेले दुर्लक्ष या पार्श्वभूमीला घेऊन मनपात सक्षम ,प्रामाणिक पर्याय उपलब्ध करून देणारे उमेदवार या महानगरपालिकेत निवडून आणणार आहोत. जनतेच्या विश्वासाला शिवसेना (उबाठा) तळा न जाऊ देता सर्वांगी विकास साधणार आहे. असे नाही केवळ सत्ता मिळवण्यासाठी तर जनतेच्या खरा प्रश्नांना व त्याच्या भविष्यासाठी लढणारी चळवळ महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही निश्चयाने पूर्ण ताकतीने, उमेदवार उभे करून निवडून आणण्याचे आत्तापासूनच शिवसेनेने संकल्प केला असल्याचे त्यांनी माध्यमातून सांगितले.