राष्ट्रीय आयुर्वेद दिन निमा चंद्रपूर शाखा तर्फे उत्साहात पार पडला



राष्ट्रीय आयुर्वेद दिन निमा चंद्रपूर शाखा तर्फे उत्साहात पार पडला

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : नॅशनल इन्टीग्रेटेड मेडिकल असोसियेशन (निमा) चंद्रपूर शाखा, अशोका हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,आणि अशोका कॉलेज ऑफ फार्मशी तसेच अशोका कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय आयुर्वेद दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे सचिव मा. अविनाश खैरे, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निमा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा श्रीमती विमलादेवी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज चे प्राचार्य *डॉ. राजू ताटेवार, निमा चंद्रपूर शाखा अध्यक्ष डॉ. दिपक भट्टाचार्य डॉ. प्रदीप मोहुर्ले डॉ. मेघराज चंदनानीडॉ. यशवंत सहारे , निमा सचिव तथा हॉस्पिटल अधीक्षक डॉ. शरद रणदिवे, अशोका इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या प्राचार्या मिस. रागिनी निखाडे, डॉ. अनिल कुकडपवार, डॉ. अमित कसुरकर, डॉ. रवीकुमार चिंतावार, डॉ. विजय भंडारी तसेच डॉ. गजानन राऊत, डॉ. भूपेंद्र लोढिया, डॉ. स्वाती कोटनाके, पार्थ बद्खलआदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान धन्वंतरी यांच्या पूजनाने करण्यात आली. या प्रसंगी डॉ. राजू ताटेवार यांनी लोकांच्या आणी जगाच्या कल्याणासाठी आयुर्वेद या विषयावर व औषधांच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे सचिव मा. अविनाश खैरे आणि डॉ. दिपक भट्टाचार्य यांनीही विद्यार्थ्यांना आपले प्रेरणादायी विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमा चंद्रपूर शाखेचे सचिव आणि अशोका हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शरद रणदिवे यांनी केले. उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. अनुष्का पाठक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रसाद दुपारचे यांनी केले.
या कार्यक्रमात अशोका इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्रा. आचल घाटे, प्रा. हर्षिता निमसारकर, प्रथमेश चलाख व ईश्वर तुराणकर यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

---