बिबट्याने शहरातील भिवापूर -लालपेठ प्रभागात दोन बकऱ्यांना बनवला निवाला !



बिबट्याने शहरातील भिवापूर -लालपेठ प्रभागात दोन बकऱ्यांना बनवला निवाला !

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

चंद्रपूर शहरातील जमंजटी परिसरातील ईरई नदीला लागून असलेल्या भिवापूर , लालपेठ वार्डातील परिसरात रहात असलेल्या शंकर सहारे यांच्या मालकीच्या असलेल्या शेळ्यांवर रात्री दोन वाजता बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्यांवर ताव मारला. या घटनेची माहिती शेळी मालकाने लालपेट येथील अमोल शेंडे यांना दिली. त्यांनी लगेच तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली असता दोन बकऱ्या मृत अवस्थेत आढळल्या. त्यांनी घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला दिली घटनास्थळी वनविभागाचे वनरक्षक यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

 संबंधित कुटुंबाला  आर्थिक भरपाई मिळावी यासाठी मागणी करण्यात आली .

 परंतु या घटनेने परिसरात पहाटेला फिरण्याला जाणाऱ्या  नागरिकाच्या जीवितास धोका असल्याचे बोलले जात आहे. तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, जंगल परिसरात असलेल्या जागेत पिंजरा लावून  बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वन विभागाकडे करण्यात आली. परंतु या घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहेत. सावधता बाळगावी अशी सूचना वन विभागाकडून करण्यात आली आहे