चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स, पोंभुर्णा तर्फे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन



चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स, पोंभुर्णा तर्फे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
पोंभुर्णा : चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स, पोंभुर्णा आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षण अभियान (PM-USHA) अंतर्गत ‘ABC ID आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020(NEP) अंमलबजावणीची आव्हाने’ या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. टी. नक्षिणे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील बहुविध (multi-faculty) अंगांचा विशेषतः उल्लेख करून त्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात ABD id च्या माध्यमातून सर्व शैक्षणिक सर्टिफिकेट, स्किल एजुकेशन सर्टिफिकेट, डिप्लोमा इत्यादी शैक्षणिक कागदपत्रे सुरक्षित कसे राहतील व त्याचा उपयोग देशात कुठेही नौकरी संदर्भात उपयोग करता येईल यावर प्रकाश टाकला. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. ओ. ए. सोनोने यांनी सादर केले.
पहिल्या तांत्रिक सत्रात श्री. प्रमोद बोरकर सहाय्यक प्रोग्रामर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी ‘ABC ID व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भूमिका’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून अंमलबजावणीतील तांत्रिक अडचणी स्पष्ट केल्या तसेच एबिसी आईडी चे महत्व विद्यार्थ्याना अनेक उदाहरण देऊन समजावून सांगितले व एबिसी आईडी बनवन्यात येणार-या अडचणी सोडविन्यास गोंडवाना विद्यापीठात माझ्याकडून पूर्णपणे सहकार्य राहील असे सांगितले. दुसऱ्या सत्रात सुपरिचित व साहित्य क्षेत्रात दीर्घ अनुभव असणारे डॉ. नरेंद्र आरेकर मराठी विभागप्रमुख, श्री. गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय, कुरखेडा यांनी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 – मल्टिपल एन्ट्री व मल्टिपल एग्झिट’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ABC id व NEP-2020 या शैक्षणिक धोरणाचा विद्यार्थ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडून येईल असे मार्मिक विचार त्यांच्या साहित्यिक भाषेतून विद्यार्थ्यांना पटवून दिले प्रमुख अतिथी म्हणून कार्यशाळेत, डॉ. राजीव वेगिनवार, डॉ. गोपाल गोंड, डॉ. शीला नरव़ाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन उपरवट यांनी तर तांत्रिक सत्राचे सुत्रसंचालन डॉ. पूर्णिमा मेश्राम यांनी केले. उद्घाटनप्रसंगी आभारप्रदर्शन डॉ. संघपाल नारनवरे यांनी केले, तर तांत्रिक सत्रे व समारोप प्रसंगी आभारप्रदर्शन श्री. विशाल कटकमवार यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. विजय बुधे, श्री. निखिल राचलवार, श्री. अजय घडले, श्री. पंकज अनंतुलवार, श्री. पराग बोमकंटिवार, श्री. राहुल सूर्यतळे, श्री. घनश्याम मारमोल्लीवार व श्री. प्रविण गुरनुले यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेला राज्यातून अनेक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ऑनलाईन व ऑफलाईन सुद्धा जुळलेले होते व कार्यशाळेचा लाभ घेतला.