राज्यातील सर्व शाळेतील चतुर्थ कर्मचाऱ्यांसाठी वाईट घंटा.. !
यापुढे ' ही 'भरती कंत्राटी पद्धतीने होणार भरती !
दिनचर्या न्युज :-
मुंबई (प्रतिनिधी)
राज्यातील सर्व शाळांमध्ये चतुर्थ श्रेणीतील पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत दिली. जे चतुर्थ कर्मचारी शाळेत पदमुक्त होत आहेत. ते कर कर्मचारी म्हणून तोपर्यंत राहतील. परंतु यापुढे राज्यातील सर्व शाळेमध्ये चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरल्या जात असल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली. यामुळे हे सरकार शिक्षणासाठी नाही तर ठेकेदारासाठी काम करतो काय असा आरोप आता सर्व स्तरातून होत आहे.
पूर्वी शाळेतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी म्हटला की, वेळेवर येणे, शाळेची घंटा वाजवणे, पिरेड चे तास संपले की घंटा वाजवणे, शाळेतील विविध कामात या चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असायचा. सामान्य कुटुंबातील, गोरगरिबावर चतुर्थश्रेणीत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर फार मोठा अन्याय होत असल्याचे बोलले जात आहे. शासनाचे धोरण कंत्राटी करण्याची असून, धनधाडग्याच्या घशात घालण्याचा हा कट असल्याचा आरोप आता विरोधकाकडून होत आहे.

