बुडत्या नगरसेवकाला सिंटेक्स टाकीचा आधार ! मग अमृत योजनेचे काय?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक एड. राहुल घोटेकर यांनी मनपाकडे पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सिंटेक्स टाकी लावून देण्याची मागणी मनपा आयुक्त यांच्याकडे केली. घोटेकर हे मागील पाच वर्षांपूर्वी नगरसेवक म्हणून होते. त्यांना जटपुरा प्रभाग सात मधून जनतेने निवडून दिले होते. मात्र आता त्यांनी सिंटेक्स टाकी चोर खिडकी, जावई मोहल्ला, तथागत बुद्ध विहार, सम्राट अशोक चौक, जय भीम चौक,चंद्रपूर समाचार परिसर आणि जल नगर येथे महानगरपालिकेचे पिण्याच्या पाण्याचे नळ मुळीच येत नाही आहेत, काही ठिकाणी नळ आले तरी धार द्वि थेंब थेंब येते आणि म्हणून या परिस्थितीत नागरिकांची पाण्यासाठी त्राही त्राही होऊन राहिली आहे. प्रभागातील गरीब जनता हि पिण्याच्या पाण्यासाठी व्याकुळ झाली आहे तरी जनसामान्यांची भावना लक्षात घेता आपण लोकांना पिण्याच्या पाण्याची सिंटेक्स टाकी लाऊन देण्याचे आणि ते नियमित भरून देण्याचे करावे तसेस ज्यांच्या घरी मुळीच नळ येत नाही अश्या नागरिकांचे सर्वे करून पाणी कर सुद्धा माफ करावे.
अशी मागणी केली. या मागणीवरून आता शहरात बुडत्या नगरसेवकाला पाण्याच्या सिंटेक्स टाकीचा आधार म्हणाव का? मग त्या अमृत योजनेचे काय?कारण आता काही महिन्यातच मनपा निवडणुकीचे वारे वाहणार आहेत!
सर्व मागणी करीत असताना चंद्रपूर शहरात अमृत योजना भाग एक व भाग दोन कार्यान्वित झाली.ती असताना यांनी मनपाकडे नगरसेवक असताना प्रभागात अमृत योजनेचे पाणी घरोघरी मिळावे यासाठी मागणी करण्या ऐवजी पाण्याची भीषण टंचाई व दुष्काळ असल्यागत पाण्याच्या टाकीची मनपा आयुक्त कडे मागणी केली. वार्डात सर्वीकडे अमृत योजनेचे पाणी मिळते की नाही यासाठी मागणी करणे माजी नगरसेवकाचे कार्य असतांना टाकी लावणे कितपत योग्य आहे. जर जनतेला घरोघरी पाणी मिळत नसेल तर अमृत योजना कशाची कोणत्या कामाची?
यावर माजी नगरसेवक संजय वैद्य म्हणाले की, मनपा प्रशासन म्हणते अमृत योजना भाग एक योजना कार्यान्वित झाली अन जुन्या योजनेचे पाणी चालू आहे. आता अमृत योजना दोन आणली आहे शहरात पाणीटंचाईचे कारण काय? टाक्या लावा अशी मागणी करण्यापेक्षा अमृत योजनेची पाणीपुरवठा नेहमीच सुरळीत करा अशी मागणी करा. असे त्यांनी म्हटले.