वीज पडून बैलाचा मृत्यू : विहिरगाव येथील घटना
दिनचर्या न्युज :
विरुर स्टेशन (प्रतिनिधी)
विहिरगाव
काल दुपारी सुमारे ३ वाजता झालेल्या मुसळधार पावसासह कडकडाटात विजेचा मोठा प्रहार झाला. या दुर्घटनेत शेतकरी राहुल लिंगा मडावी (रा. विहिरगाव) यांचा बैल जागीच ठार झाला.
सध्या सततच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असतानाच बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी मडावी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. शेतीकामासाठी आवश्यक असलेला मुख्य आधारच हरवल्याने ते आर्थिक संकटात अडकले आहेत.
शेतकरी मडावी यांना तातडीने शासनाकडून मदत मिळणे आवश्यक आहे. योग्य वेळी मदत मिळाल्यास ते दुसरा बैल घेऊन शेतीकाम पुन्हा सुरू करू शकतात, अन्यथा त्यांच्या शेती कामांवर मोठे संकट ओढावण्याची शक्यता आहे.
