समाजभूषण महान भौतिक खगोलशास्त्रज्ञ डॉ. मेघनाद साहा यांच्या १३२ व्या जयंती निमित भावपूर्ण आदरांजली
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
भारताचे महान भौतिक खगोलशास्त्रज्ञ डॉ. मेघनाद साहा यांची १३२ वी जयंती जटपुरा पंचतेली हनुमान मंदिर सभागृह, चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज व समाजभूषण डॉ मेघनाद साहा यांच्या प्रतिमांना पुष्पहार व पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. समाज भूषण थोर भौतिक खगोलशास्त्रज्ञ डॉ मेघनाद साहा यांनी केलेल्या संशोधनाला संपूर्ण विश्वात आजही मान्यता आहे. एव्हढेच नव्हे तर १९५२ मध्ये आताच्या पश्चिम बंगालच्या कलकत्ता येथील कल्याणी निर्वाचन क्षेत्रातून पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार म्हणून निवडून गेलेले पहिले शास्त्रज्ञ होते. नोबेल पारितोषिक प्राप्त महान शास्त्रज्ञ सी.व्ही.रमन व सत्यन्द्रनाथ बोस यांचे समकालीन होते. खासदार असतांना भारतात त्यांनी अनेक संस्थांची निर्मिती केली. आजही अनेक संशोधकांना त्यांचे कार्य प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला अनेकांची भाषणे यावेळी झाली. जेष्ठ विधीतज्ञ एड. विजय मोगरे, एड. दत्ताजी हजारे, डॉ. विश्वास झाडे, श्री. विनायकजी बांगडे, श्री. पांडुरंगजी आंबटकर, विदर्भ तेली समाज जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. संजय बेले, कार्याध्यक्ष डॉ. नामदेवराव वरभे, प्रांतिक जिल्हाध्यक्ष, अजय वैरागडे, एल्गार तैलिक चे जिल्हाध्यक्ष जितेंद्र ईटनकर, संताजी फौंडेशनचे अध्यक्ष विकास घटे, महिला अध्यक्ष चंदाताई ईटनकर, सामाजिक कार्यकर्ते शैलेशजी जुमडे, ओबीसी चळवळीतील नेते राजेशजी बेले, शहर अध्यक्ष अभय घटे, राहुल क्षीरसागर, प्रा. शाम धोपटे, सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे, सिनेट सदस्य यश बांगडे, अनिल घुमडे, सुरेश जुमडे, नंदू मोगरे, रवी लोणकर, मनोहर बेले, श्री पोहाणे, श्री येरणे, श्री पोटदुखे, गोपी खोब्रागडे व इतर मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .