शासनाचा स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ ,शेखर,संतोषच्या घशात !
पुरवठा अधिकाऱ्यांची खुली सूट !
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
जिल्ह्यातील राशन धारकांना स्वस्त धान्य दुकानात मिळणा-या गहू ,तांदळाचा काळाबाजार अनेकदा वाचला असेल ! शासनाकडून केसरी, पांढरा, पिवळा, बीपीएल अशा कार्डधारकांना शासनाकडून अन्य पुरवठा म्हणून शासकीय स्वस्त धान्य दुकानदाराकडून मापक दरात राशन दिल्या जाते. याच राशनचा काळाबाजार अनेक स्वस्त धान्य दुकानदार बिनधास्त करतात. एवढेच नाही तर या रासनधारकाच्या दुकानातून काही किरकोळ विक्रेते कमी किमतीत राशन खरेदी करून ते राशन शेखर आणि संतोषच्या घशात घालतात. गोरगरिबांना मिळणाऱ्या राशन वर हे दलाल आपली पोळी शेकून दुकानदारी चालवत आहेत. शहरात असो की ग्रामीण भागात घरोघरी जाऊन स्वस्त धान्यातून मिळणारे राशन खरेदी करण्याचे राकेटच तयार आहेत. ते वीस रुपये किलोच्या दराने किंवा पाहिलीने तांदुळ विकत घेऊन सर्रास ऑटो किंवा छोटा हत्ती या वाहनाच्या द्वारे चंद्रपुरात प्रसिद्ध असलेल्या बा-गलातील शेखरच्या गोडाऊनमध्ये, तर वीरूर येथील संतोषच्या गोडाऊन येते सर्रास तांदूळ विकला जातो. या विक्री केंद्राचे अवैध्य अड्डे हे पुरवठा अधिकाऱ्यांना माहित असताना सुद्धा याकडे हेतू पुरस्कर अर्थकारणामुळे आंधळेपणाचा सोंग घेऊन कारवाईकडे दुर्लक्ष करतात.
या अधिकाऱ्यांच्या खुल्या सूटमुळे शासकीय तांदळाच्या रॉकेटचे फार मोठे विस्तारन झाले असून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सक्रिय दलाल तयार असून याचे फार मोठे राकेट जिल्ह्यात सक्रिय असल्याची बाब समोर येत आहे.
