समाजाच्या 'आरशाला' पालकमंत्र्याकडून केराची टोपली !



समाजाच्या 'आरशाला' पालकमंत्र्याकडून केराची टोपली !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असे संबोधले जाते.
वर्षभर कुठल्याही संकटाला न घाबरता सत्याच्या बाजूने न्याय देण्यासाठी बातमीच्या शोधात फिरणाऱ्या पत्रकाराला
वर्षातून एकदा दिवाळीसाठी जाहिरातीच्या शोधात फिरताना मात्र सगळीकडून त्याला अवेलना, मौन का येतं? पत्रकार अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, समाजासाठी झडतो, दीनदुबळ्याच्या बलुतेदारांच्या आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा त्याला वर्षभर वर्तमानपत्र काढण्यासाठी थोडं आर्थिक बळ हवं असतं त्यावेळेस मात्र लोकांची दर किनार असते. फोन केला, त्यांच्या कार्यालयात गेले . जाहिरातीसाठी पत्र दिले तर लोक पाठ फिरवतात.
यावेळी पत्रकारांना एक उमेदीचा आरसा होता तो म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडे होता. पालकमंत्री गावात राहत नसले तरी, त्यांचा दौरा जर चंद्रपूर जिल्ह्यात झालास तर सर्वप्रथम जिल्हा माहिती कार्यालयातून पालकमंत्र्यांच्या दौऱ्या संदर्भात माहिती आणि संबंधित पालकमंत्र्याची पत्रकार परिषद असल्याची खबर जिल्हा माहिती कार्यालयाकडून  पत्रकाराला दिल्या जाते.  त्यासाठी पत्रकारही पालकमंत्र्याच्या पत्रकार परिषदेला किंवा दौऱ्याला  बातमी कव्हर करण्यासाठी आवर्जून जातात. मात्र वर्षातून एकदा पत्रकार दिवाळीत आर्थिक बळ मिळावं म्हणून पालकमंत्र्याच्या कार्यालयात जाहिरातीसाठी पत्र देतात. परंतु त्या पत्राला  पालकमंत्र्याकडून  केराची टोपली दाखवल्या जाते!
सर्व   शासनकृत  यादीवर असणाऱ्या  पत्रकारांची  हिरमोड होते. कुणीतरी एक पालकमंत्र्याचा माणूस येतो. आणि एखाद्या  माध्यमाच्या प्रतिनिधीला आपली जबाबदारी सोपवून देतो. मग पालकमंत्र्याच्या स्थानिक कार्यालयात कर्मचारी नाहीत का? असा प्रश्न आता माध्यमाच्या प्रतिनिधिणा पडू लागतो?
पहिलेच पालकमंत्र्याचे आगमन हे जिल्ह्यासाठी पाहुणचारासारखे झाले आहेत. पालकमंत्री जिल्ह्यात आहेत की,नाहीत अशी खंत आता जिल्हा वाशियांना होत आहे. अशातच वर्षभर  आपल्या प्राणाची पराकष्ट करणाऱ्या  पत्रकारांवर पालकमंत्र्याकडूनच  अन्याय होत असेल तर  पत्रकारांनी कुणाकडे हाक मागायची. असा प्रश्न मात्र  माध्यमाच्या प्रतिनिधींना पडत आहे.
आता अशी परिस्थिती झाली आहे की, आपल्या वृत्तपत्रासाठी वर्षातून एकदा जाहिरात मागतो.  तेव्हा राजकीय, सामाजिक, औद्योगिक अशा सर्वांच्या नजरा  वळत्या झाल्या आहेत.फोन बंद होतात, उत्तरं टाळली जातात, आणि ओळखही विसरली जाते.
"बघूया नंतर... सध्या थोडं व्यस्त आहोत!"
पण जेव्हा सामाजिक. राजकीय अशावर जेव्हा संकट येतात तेव्हा मात्र   पोलिसांकडून न्याय मिळत नाही  तेव्हा सर्वांनाच चौथ्या स्तंभ  आठवतो! मग आपली बातमी शासनापर्यंत पोहोचवावी अशी उम्मीद यांच्याकडूनच होते.
पण अशा आरशांना स्वच्छ ठेवण्यासाठी वर्षातून एकदा हातभार लावला तर! काय यांचं घोडं मरणार आहे!
वर्षातून जाहिरात मागणे म्हणजे, पैसाच नव्हे, जर वर्षभर असलेले स्नेह ,आपुलकी याची तडजोड करणारा पत्रकार असतो. वर्षभर तुमच्या  बातमीतून न्याय देण्यासाठी पत्रकार झटत असेल तर,  मग मदतीची अपेक्षा ठेवणे योग्य नाही का? पत्रकार हा जनतेचा पहारेकरी! तो कुणाचा गुलाम नसला तरी! समाजाच्या न्याय हक्कासाठी लेखणी  चालवतो! बऱ्याच  लोकांचा पत्रकारांकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलला , पण अजूनही  वाचकांसाठी माध्यमे जिवंत आहेत! आज अनेक पत्रकार  आर्थिक अडचणीत आहेत. अनेकांना सत्यासाठी झटताना अनेक संघर्षातून जावं लागतं.  त्याच्याकडे शस्त्र म्हणून पेनाचे टोक त्याच्या  लढाईच अस्त्र असतं!
"जाहिरात नाही दिली तरी आमचं कर्तव्य थांबणार नाही!"
पत्रकारांना आर्थिक मदत नाही मिळाली तरी हरकत नाही, पण नैतिक पाठिंबा द्या. चौथ्या स्तंभाचा दीप सदैव उजळत राहील!   कारण अंधारातही  पेटणारी ज्योत उजेड देतो. 
पत्रकारही समाजाला लेखणीतून उजेड देण्याचे काम करत !