अखेर त्या वादग्रस्त तहसीलदार व नायब तहसीलदारवर निलंबनाची कारवाई



अखेर त्या वादग्रस्त तहसीलदार व नायब तहसीलदारवर निलंबनाची कारवाई

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :- भद्रावती तालुक्यातील अनेक प्रकरणात वादग्रस्त असलेले तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना न्यायालयाच्या आदेशानंतरही अभिलेखात फेरफार करण्यात हयगय, न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न करता कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले. चंद्रपूर लगतच्या मोरवा येथील परमेश्वर विश्वनाथ मेश्राम यांनी कुरोडा येथील शेत शेतजमिनीवर 2015 च्या न्यायालयीन आदेशानुसार वारसदारांचे नावे अभिलेखात नोंदवण्यासाठी रीतसर तहसील कार्यालयात अर्ज केला होता. मात्र वादग्रस्त राहिलेल्या तहसीलदाराने व नायब तहसीलदाराने आदेशाची अंमलबजावणी न करता प्रकरणात मालकी हक्काबाबत वाद असल्याचे नमूद करून अर्ज निकाली काढला होता. अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतरही न्याय न मिळाल्याने निराश झालेल्या परमेश्वर मेश्राम यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी तहसील कार्यालयातच विष प्राशन केले होते. निढळ अधिकाऱ्याने याकडे दुर्लक्ष केले. सध्या ते रुग्णालयात गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू सुरू असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणाची महाराष्ट्र गंभीर दखल घेत. महसूल अधिनियम 1966 आणि महाराष्ट्र नागरी सेवा आचारसंहिता नियम 1969 च्या उल्लंगणाबाबत दोन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. या निढळ, मगरूळ तहसीलदार अनेक प्रकरणात वादग्रस्त राहिले आहेत ते शेतकऱ्यांची कामे महसूल विभागातील अधिकाराकडून अडवल्या जात असून अशा अनेक तक्रारी आणि शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर ही शासनाने कठोर पावला उचलत ही कारवाई केली आहे.

तहसीलदार राजेश भांडारकर यांचा वादग्रस्त काळ हा चांगलाच गाजला असून वरोरा येथील कार्यरत असताना वादाच्या भोवरा सापडले होते. अवैध्य रेती, मुरूम उत्खननाच्या असे अनेक कामे नियमबाह्यप्रकारे त्यांनी केली . कार्यालयात गैरहजर राहून शेतकऱ्यांच्या लोक अदालतित अनुपस्थित राहणे, तक्रारीत विलंब करून प्रलंबित ठेवणे, शेतकऱ्यांचे ग्रामस्थानाच्या समस्या न सोडवणे, अशा अनेक वादग्रस्त प्रकरणात असलेल्या यात तहसीलदारावर नागरिकांची नाराजी होती. दरम्यान नागरी संरक्षण व समितीचे अध्यक्ष विठ्ठल बदखल यांनी त्यांच्याविरोधात अनेकदा वरिष्ठाकडे तक्रारी केल्या होत्या.

विष प्राशन प्रकरण तहसीलदाराला चांगलेच  भोवले. शेतकऱ्यांनी  विष  प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केल्यानंतर तहसीलदार व नायब तहसीलदारांनी कामात हयगय केल्याचा ठपका ठेवत चंद्रपूर जिल्हाधिकार्‍यांनी या संदर्भाचा तात्काळ अहवाल शासनाकडे निलंबनासाठी पाठवला होता. या प्रस्तावावर शासनाच्या महसूल विभागाने तात्काळ कारवाई करीत दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यामुळे महसूल प्रशासनात  कामात  दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलीच धास्ती भरली आहे.