वन्य जीव सप्ताह कार्यशाळेत अनेक पैलू वर वन विभागाकडून माहिती


वन्य जीव सप्ताह कार्यशाळेत अनेक पैलू वर वन विभागाकडून माहिती

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे वन्यजीव सप्ताह च्या निमित्ताने पत्रकारासाठी एक दिवसाची कार्यशाळा आणि ताडोबा अंधारी टायगर रिसॉर्ट यांच्या माहिती संदर्भात पत्रकारांना अनेक पैलू वर अभ्यासपूर्ण माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

कार्यशाळेत उपसंचालक वन विभाग चे आनंद रेड्डी यांनी मार्मिक अशी कोर आणि बफर यामध्ये वन जीवा संदर्भात माहिती दिली. वन विभागासाठी सायबर सेल ची सुरुवात करण्यात आली. अनेक बाबीवर रिसर्च सुरू आहेत. वन विभागात नवीन नवीन योजना राबवल्या जात आहे. जंगलव्याप्त परिसरात असलेल्या बरेच पुनर्वसन झाले आहेत. जंगलात असलेला 40 वर्षात पूर्वीचा बांबू वाढला असून त्या ठिकाणी नवीन बीज नैसर्गिक पुरवल्या जात आहेत. जंगलात मानव जीव संघर्ष यासाठी वन नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आले आहे. स्थानिक वादावर क्रूजर गाडी वरून जो वाद निर्माण आहे त्यासाठीच स्थानिकांना काही साप्ताहिक 4 जिप्सी उपलब्ध करून स्थानिकांनाही या ठिकाणी वाव दिला जात आहे. या परिसरात प्रदूषण मुक्त यासाठी अनेक प्रबंध निर्माण केले आहेत. ते कळकोट पाडल्या जात आहे. जिप्सीच्या वेगासाठी जंगल सफारी मध्ये 30 किलोमीटर वेगाच्या वर चालवण्यास बंदी लावण्यात आली आहे. जंगलात लगतच्या गावाला साडेतीन लाख विकास निधी दिला जातो. 5000 विद्यार्थ्यांचे मोफत सफारी करण्यात आली. महिला बचत गटांना मोफत सफारीचा आनंद घेता येते.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील सातारा हे गाव स्वच्छ(क्लीन )गाव म्हणून प्रसिद्धी झाले आहे. संपूर्ण देशात 5000 वाघ असून त्यात फक्त ताडोबात 95 वाघ असून जिल्ह्यात 240 वाघ असल्याची माहिती दिली. जंगलवाप्त क्षेत्रात ईडीसी ग्राम स्तरावर नेमणूक करण्यात आली असून ती चांगल्या तऱ्हेने काम करत असल्याची माहिती दिली. अशा विविध पैलूंवर वन क्षेत्रातील अनेक पशुपक्षान,प्राण्यांवर माहिती दिली असून. जंगलवाप्त क्षेत्रात नागरिकांनी जाऊ नये. असा सल्लाही दिला.

तत्वतः ताडोबा वन क्षेत्रात येत असलेल्या सिताराम पेठ या गावा लगत जंगल परिसरात ए आय बेस्ट कॅमेरे बसवण्यात आली. 100 मीटर वर वनजीवप्राणी यांच्या हालचाली ओळखता येतात.असल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दाखवून दिली.त्यामुळे या क्षेत्रात दोन वर्षात वाघ, बिबट, अस्वल यासारख्या इस्त्रप्रशूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आणि वन प्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत याची माहिती प्राथमिक कृती दल हे गावकऱ्यांना  देतात. यामुळे जीवित  हानी होण्यास  प्रावबंद आले आहेत.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना जंगल सफारी करून जंगलात वाघ  कशा प्रकारची शिकार करतात. मानवावर वाघ हा अचानक हमला करत नसून  तो वाकून  असल्यास त्याला जनावर समजून त्याच्यावर अटॅक करतो. अशा वेळेस तो अपघात असल्याचे समजावे असे त्यांनी सांगितले.  वन क्षेत्रात  विविध गवतांच्या लागवडी संदर्भात संबंधातील माहिती दिली. ते  प्राण्यांसाठी उपयुक्त आहेत.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नवेगाव हे गाव  विस्थापित करण्यात आले त्या गावातील  जागेवर 275 हेक्टर जागेत गवती कुराण तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी विविध तृणधान्य तयार होत असून या ठिकाणी तृणधान्य च्या बिया त्या ठिकाणी उगवून  गवती कुराण  तयार करण्यात आले.कारण निसर्गाचा नियम आहे .वाईट वस्तू लवकर येते. आणि चांगल्या वस्तू ह्या याला वेळ लागतात. म्हणून या ठिकाणी तृणधान्य, वन तूळ, रान मुंग, रान बाजरा, रान धान, अशा विविध प्रकारच्या एकदल द्विदल तृणधान्य वनस्पती तयार करण्यात आले आहेत. ह्या वन जीवासाठी अतिशय प्रतीने युक्त आहेत. वन जीवाच्या वाढीसाठी जास्त प्रथिने या तृणधान्यातून मिळते. म्हणून नवेगाव  ताडोबाला 'मशिया मारा' असे म्हटले जाते आफ्रिकेत असे नाव आहेत. अशा प्रकारच्या विविध माहिती माध्यमांना कार्यशाळेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी  माहिती वन विभागाकडून देण्यात आली.