नागपुरात सकल ओबीसीचे पिवळे वादळ, ये झाकी है तुफान बाकी है!- विजय वडेट्टीवार




नागपुरात सकल ओबीसीचे पिवळे वादळ, ये झाकी है तुफान बाकी है!- विजय वडेट्टीवार

दिनचर्या न्युज :-
नागपूर :-
नागपूर येथे सकल ओबीसी महामोर्चा आयोजित केला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले ओबीसी बांधव नागपूरातील रस्त्यावर पिवळे वादळ दिसून येत होते. महायुती सरकारने 2 सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. हे फडणवीसचे सरकार जरांगे ना आमच्या मुळावर उठवला आहे. त्याचे काम करण्यासाठी जरांगे पुढे चुकले आहे. म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी नागपुरात ही महामोर्चाची झाकी आहे. तुफान अजून बाकी आहे. आता सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही मुंबईच नव्हे तर पुणे, ठाणेही जाम करू असा इशारा ओबीसी नेते विजय वडट्टीवार यांनी नागपूर येथील सविधान चौकात ओबीसी महामोर्चाप्रसंगी दिला.
ओबीसी ने आपल्या हक्कासाठी गदा आणणाऱ्यावर महामोर्चा ची ताकद दाखवून दिली.
ओबीसी मधील मूळ जाती 374 उपजाती धरून 871 जाती या प्रवर्तित आहेत. मराठी ही जात आहे. एवढ्या मोठ्या ओबीसीच्या समुदायाला जे 56% स्थान आहे. त्यात 27 टक्के आरक्षण मिळतो. या जातीच्या संख्येनुसार ओबीसी 85% वर आहे मात्र 52% वर आरक्षण मिळतो. त्यातही 27% हे मूळ ओबीसीला जातं. मात्र 15 टक्के लोकांना 48 टक्के आरक्षण देण्याची चाणक्य नीति ही महाराष्ट्र सरकारने जरांगे समोर झुकून. समाजातील आपसापसात भांडण लावण्याचे काम करतो आहे.
हा जीआर वाचल्यावर कडेल की हे 'नाचे आहेत की सोंगे' आहेत, सोंगे आहेत की पोंगे आहेत. हे तुमच्या लक्षात येईल.
पीडब्ल्यूएस मध्ये मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिले आठ टक्के आरक्षणामध्ये त्यांना नोकरीमध्ये फायदा मिळतो आहे. आत्ताच झालेल्या कृषी सहाय्यक पदामध्ये सर्व मराठी प्रमाणपत्राचे आधारावर नियुक्त्या झाल्या आहेत. विदर्भातील ओबीसी मुलांना कुठेही जागा मिळाली नाही. शासन निर्णयानंतर मराठवाड्यात दररोज हजारो प्रमाणपत्र वाटप सुरू आहे. यामुळे राज्यात ओबीसी तरुणांच्या आत्महत्याचे सत्र सुरू आहेत. फक्त जरांगेच्या भरोशावर सरकार आले का? ओबीसींच्या 372 तिन्ही सुद्धा सरकारला भरभरून मते दिले. सरकारच्या या शासन निर्णयामुळे ओबीसीच्या मानेवर सुरी फिरवण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे. सरकारमध्ये दम असेल तर तेलंगा सरकार प्रमाणे 42 टक्के आरक्षण द्यावे. अशा विविध मागण्या विजय वडेट्टीवर यांनी महामोर्चा केली.
ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी सरकार थांबणार नसेल तर सरकारला थांबवण्याची ताकद आपण निर्माण करू असे वडेट्टीवार म्हणाले. यशवंत स्टेडियम पासून निघालेल्या लाखोच्या संख्येने ओबीसी समाज बांधवांनी सविधान चौकाच्या दिशेने महामोर्चा काढला. दोन सप्टेंबरला जीआर काढला, तो काळा जीआर रद्द करा. 'जय ओबीसी' आणि गळ्यात दुपट्टे घातलेले ओबीसी लिहिलेले डुपटे नागपुरातील रस्त्यावर पिवळे वादळ दिसून येत होते.
ओबीसी समाजाचा आतापर्यंत झालेला सर्वात मोठा मोर्चा ठरला. संविधान चौकात या महामोर्चाचे सभेत रूपांतर झाले. विजय वडेट्टीवर मनाले, हा जीआर रद्द झाला नाही तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही, म्हणून ओबीसी समाजाने संघटन होण्याची गरज आहे. असे आव्हाने त्यांनी ओबीसी बांधवांना केले. ओबीसी समाजात घुसखोरी करून बेईमानीने आरक्षण डावलण्याचा काम केल्यास त्याचा बंदोबस्त करण्याची तयारी समाजाने ठेवावी.
' आखो मे पानी रखो, होटो मे चिरांगी रखो, अगर जिंदा है तो लढले तयारी रोको' अशा शब्दात लाखोच्या संख्येने उपस्थित ओबीसी समाज बांधवांना आव्हान केले.
 यावेळी ओबीसी  नेत्या खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार श्याम कुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, माणिकराव ठाकरे,  आमदार अभिजीत वंजारी, आमदार  रामदास मसराम, बाळासाहेब मंगरूळकर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, रा स प चे महादेव जानकर,  ओबीसी नेते लक्ष्मण हाके, बारा बलुतेदाराचे नेते  कल्याणराव दळे, नवनाथ वाघमारे, यास अनेक  ओबीसी नेते या महामोर्चात उपस्थित झाले होते.