कुस्तीगीर पैलवान भावेश बनसोड याचा नाभिक समाजाकडून सत्कार



कुस्तीगीर पैलवान भावेश बनसोड याचा नाभिक समाजाकडून सत्कार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
नाभिक समाजातील कुस्तीगीर पैलवान भावेश बनसोड याचा नाभिक समाजाकडून सत्कार करण्यात आला.
आज छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथून सायंकाळी कुस्तीगीर पैलवान भावेश बनसोड त्यांची कुस्तीगीर संघाकडून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आपल्या लाडक्या पैलवानाला अभिनंदन व शुभेच्छा देण्यासाठी नाभिक समाजही मिरवणुकी सहभागी झाला.
नुकत्याच संपन्न झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, खोपोली, जि. रायगड येथे आयोजित 17 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये ५१ किलो वजन गटात ग्रीको-रोमन विभागात यांनी सुवर्णपदक प्राप्त करून महाराष्ट्र संघातून त्याची ६९वी राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संपूर्ण नाभिक समाजाकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
यावेळी नाभिक समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तूभाऊ कडूकर,श्याम राजूरकर नाभिक समाज,सामाजिक कार्यकर्ता उपाध्यक्ष - चंद्रपूर शहर तालीम संघ चंद्रपूर , दिनेश एकवणकर, सुशांत नक्षिने, प्रकाश चांदेकर, राजेंद्र बनसोड, प्रशांत वाटेकर, नागतुरे,
प्रेम ज्योती नाभिक समाजाच्या अध्यक्षा सरोज चांदेकर, संध्याताई कडूकर, रंजना राजूरकर, या समाजातील नागरिकांची उपस्थिती होती.