उदापूर ब्रह्मपुरी येथे इथेनॉल प्लांटला भीषण आग
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उदयपूर येथील रामदेव बाबा solvents RBS या कंपनीमध्ये भीषण आग लागली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सदरील ठिकाणी 1.25 लाख लिटर इथेनॉलचा साठा होता. त्या ठिकाणच्या डिस्टेन्शन प्लांटला आग लागलेली आहे.
सध्या कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.
घटनास्थळी ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही व मूल येथील फायर ब्रिगेड पोचलेले आहेत, तसेच गडचिरोली जिल्ह्यातून दोन फायर ब्रिगेड वडसा येथून हजर झालेले आहेत.
तसेच महानगरपालिका चंद्रपूर येथील दोन फायर टेंडर फोम solution सोबत रवाना करण्यात आलेले आहेत.
सध्या कोणतेही जीवित हानी ची नोंद नाही.
सदरील आग आटोक्यात आलेली आहे,
कुलिंग प्रक्रिया सुरू आहे, कोणतीही जीवित हानी नाही. अशी माहिती समोर आली आहे.
आग कशाने लागली याची चौकशीअंती माहिती समोर येईल.
