.. या गुन्ह्य़ातील दोन अल्पवयीन बालकासह एक आरोपी पकडण्यात चंद्रपुर शहर पोलीसांना यश




.. या गुन्ह्य़ातील दोन अल्पवयीन बालकासह एक आरोपी पकडण्यात चंद्रपुर शहर पोलीसांना यश

जबरी चोरी, मोटार सायकल चोरी व मोबाईल चोरी...!
गुन्ह्यातील दोन अल्पवयीन बालकासह एक आरोपी पकडण्यात चंद्रपुर शहर पोलीसांना यश

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे दि. ११/०७/२०२५ रोजी फिर्यादी हे आपले पत्नीसोबत मोबाईलवर बोलत असताना कोणीतरी मागुन पांढऱ्या रंगाची मोपेड स्कुटीवर अनोळखी ईसम हा फिर्यादीचे समोर येवुन आपली गाडी आडवी थांबवुन फिर्यादीचे हातातील Vivo कंपणीचा मोबाईल कि. ७००० रू. चा जबरीने हिसकावुन घेवुन पांढऱ्या रंगाच्या स्कुटीने भरधाव वेगाने पळुन गेला. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून अप.क. ४७३/२५ क. ३०९ (४) बि.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

नमुद गुन्ह्यात आरोपीस अटक करून अरोपी नामे शेख राजा अमन कुरेशी, वय २० वर्ष, रा. बगडखिडकी चंद्रपुर यास अटक करून याचेकडुन १) Vivo कंपणीचा मोबाईल कि. ७००० 혁.
गुन्ह्यात वापरलेली एम.एच.३४ए बि.एस.२४५२ किं. अं.५०,००० रू. असा एकुण ५७,००० रू. चा माल जप्त करण्यात आला.
तसेच पोलिस स्टेशन चंद्रपुर शहर येथे दाखल असलेले मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यात बाबुपेठ येथील विधीसंघर्षग्रस्त बालक याचेकडुन २) अप.क.६६८/२५ क. ३०३ (२) बि.एन.एस मधील हिरो होन्डा स्पेंडर क.
एम.एच.३४, ए.एन.२५०५ किं. अंदाजे १५,००० रु.
३) अप.क. ७७९/२५ क. ३०३ (२) बि.एन.एस. मधील फिर्यादीची मोटार सायकल होन्डा स्पेंडर क.एम.एच.३४, बि.वाय.२८८६ किं. अंदाजे ५०,००० रु. ४) अप.क. ७७९/२५ क. ३०३ (२) बि.एन.एस. मधील फिर्यादीची मोटार सायकल होन्डा स्पेंडर क.एम.एच.३४, बि.वाय.२८८६ किं. अंदाजे ५०,००० रू असा एकुण १,१०,००० रू. चा माल जप्त करण्यात आला.
५) घुटकाळा वार्ड येथील विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन अप.क. ७८१/२५ क.३०५,३३१ (३) बि.एन.एस. मधील फिर्यादीचा चोरीस गेलेला मोबाईल १) Vivo कंपणीचा मोबाईल कि. १३,५०० रू., २) रेडमी - ३० कंपणीचा कि. अं. १४,००० रू. चा असा एकुण २७,५०० रू. चा माल जप्त करण्यात आला.
वरिल पाचही गुन्‌ह्यातील बाबुपेठ येथील विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन ३ मोटार सायकल, व घुटकाळा वार्ड येथील विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन दोन मोबाईल, जबरी चोरीतील आरोपीकडुन एक मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी असा एकुण १,९४,५०० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक श्री. ईश्वर कातकडे, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके पो.स्टे. चंद्रपुर शहर, यांचे नेतृत्वात सपोनि. राजेंद्र सोनवणे, पोउपनि. दत्तात्रय कोलते, पोउपनि. विलास निकोडे व त्यांच्या डि.बी. पथक कर्म म.पो.हवा. भावना रामटेके, पोहवा. सचिन बोरकर, संजय धोटे, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, कपुरचंद खरवार, पो.अं. रूपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, प्रफुल भैसारे, सारिका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी केलेली आहे.