असहाय विधवा महिलेकडुन एक लाखाची खंडणी वसुल करणाऱ्या टोळीला अटक , दोघे फरार ! पोलीस स्टेशन रामनगरची कामगिरी




असहाय विधवा महिलेकडुन एक लाखाची खंडणी वसुल करणाऱ्या टोळीला अटक , दोघे फरार !
पोलीस स्टेशन रामनगरची कामगिरी

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
दिनांक ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी चंद्रपूर शहरातील एक असहाय व विधवा महिलेला ५-६ लोकांनी पत्रकार असल्याचा धाक दाखवून तिच्या घरी जाऊन ती अवैध काम करत असुन त्याबाबत तिची बातमी प्रसिध्द न करण्यासाठी तिच्याकडून एक लाख रुपयाची मागणी करुन पैसे न दिल्यास तिला ठार करण्याची धमकी देऊन तिच्याकडून जुलमाने एक लाख रुपये खंडणी स्विकारल्याची तक्रार रामनगर पोलीसांना प्राप्त झाल्याने त्याबाबत अपराध क्र. ८७७/२०२५ कलम ३०८ (५), ३३३, ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान रामनगर पोलीसांनी सदर पत्रकारांबाबत माहिती काढली असता ते चंद्रपूर शहरातील वेगवेगळया दैनिक न्युज पेपर, वेबपोर्टल न्युज व न्युज टी. व्ही. चॅनलचे संपादक, जिल्हा व तालुका प्रतिनिधी असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांची नावे निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेतले असता -
१) सत्यशोधक न्युज, चंद्रपूर (वेबपोर्टल) मुख्य संपादक -
राजु नामदेवराव शंभरकर, वय ५७ वर्ष, रा. घर नं. ९८२, लालपेठ कॉलरी नं. १ चंद्रपूर
२) इंडिया २४ न्यूज, चंद्रपूर (वेबपोर्टल) चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -
कुणाल यशवंत गर्गेलवार, वय ३७ वर्ष, रा. विठ्ठल मंदीर वार्ड मथुरा चौक चंद्रपूर
३) दैनिक विदर्भ कल्याण, उमरेड नागपूर (दैनिक न्यूज पेपर) चंद्रपूर तालुका प्रतिनिधी -अविनाश मनोहर मडावी, वय ३३ वर्ष, रा. इंदिरानगर मुल रोड चंद्रपूर
४) भारत टी.व्ही. न्यूज, आग्रा (टी. व्ही. चॅनल) चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -राजेश नारायण निकम वय ५६ वर्ष रा. जमनजेट्टी पाटील वाडी, लालपेठ वार्ड चंद्रपूर
वरील नमुद इसमांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हयाची कबुली दिलेली आहे. सदर गुन्हयातील नमुद आरोपीतांचे आणखी दोन साथीदार असल्याचे निष्पन्न झाले असुन त्यांचाही शोध घेणे सुरु आहे.
सदरची कारवाई श्री. मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्री प्रमोद चौगुले उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात सपोनि श्री देवाजी नरोटे, श्री निलेश वाघमारे, श्री हनुमान उगले, पोअं. जितेंद्र आकरे, शरद कुडे, आनंद खरात, लालु यादव, बाबा नैताम, मनिषा मोरे, रविकुमार ढेंगळे, पंकज ठोंबरे, प्रफुल्ल पुप्लवार, संदिप कामडी, सुरेश कोरवार, रुपेश घोरपडे व ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे.
नागरिकांना आवाहन जिल्हयात कोणासही कोणीही पत्रकार अथवा पोलीस असल्याची बतावणी करुन अशा प्रकारचे फसवणुक करुन लुटमार केली असेल किंवा खंडणी मागत असेल तर त्यांनी तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशन ला किंवा डायल ११२ वर संपर्क करुन माहिती दयावी.