चंद्रपुरात ए यु स्मॉल फायनान्स बँक तोडतो गरीबाचे लचके ! ग्राहकाने सोने गहाण ठेवूनही नाही मिळाले एक लाख रुपये!





चंद्रपुरात ए यु स्मॉल फायनान्स बँक तोडतो गरीबाचे लचके ! ग्राहकाने सोने गहाण ठेवूनही नाही मिळाले एक लाख रुपये!

बँकेच्या व्यवहाराने ग्राहक परेशान!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात यू स्मॉल फायनान्स बँक चा प्रताप चांगला ग्राहकाच्या जीवारी लागला. बँकेच्या घटिया व्यवहारावर, आणि आता विश्वासावरच गंभी प्रश्न उपस्थित केले गेले आहे. एयु स्मॉल बँकेत ग्राहकांनी आपले सोने गहाण ठेवून लोन उचलण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यावर ग्राहकांना वापस पाठवण्यात आले. असा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.
चार तासाची प्रक्रिया केल्यानंतरही ग्राहकाला पैसे नाही मिळाल्याची बाप समोर आली.
शकील पठाण नावाच्या व्यक्तीने या चंद्रपूर बँकेत आपले सोने गहाण ठेवून एक लाख रुपये घेण्यासाठी  गेले असता. त्याला  तासन तास वाट  पाहण्याची नामुष्की आली.
 एक तासाच्या नंतर  शकील पठाण यांना बोलावून  त्यांच्या नावाने नवीन खाते एयु बँक मध्ये खोलल्या गेले.
 या प्रक्रियेत  तीन-चार घंटे चा वेळ त्यांचा वाया गेला. एवढे केल्यानंतरही त्यांना  वाट पाहत बसावे लागलं. वैल्युएर आल्यावर, सोन्याची तपासणी करून मुलांकत करेल तोपर्यंत पैसा मिळणार नाही.  अंदाजे  दीड तासानंतर 
वैल्युएर  आलेत सोन्याची पडताळणी  प्रक्रिया पुरी केली केली. त्यांच्या खात्यात एक लाख रुपये ट्रान्सफर करायचे होते. आपण जाऊ शकता आपल्या खात्यात पैसे जमा होऊन जाईल. अशी बेजबाबदार वक्तव्य  केल्यानंतरही सायंकाळी सात वाजेपर्यंत कुठलेही खात्यात पैसे जमा झाले नाही. शकील पठाण यांनी बँक कर्मचाऱ्यांची संपर्क साधून विचारपूस केली असता  आपल्या खात्यात जर पैसे आले नसतील तर आपण आपले सोने वापस घेऊन जाऊ शकता. ते म्हणाले की मी वनी चारगाव येथे असल्यामुळे मी बँकेत  सध्या येऊ शकत नाही. यानंतरही त्यांना बँकेकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. पैसे मिळालेच नाहीत तरी  सोने  बँके कडेच जमा  असल्याचे ते म्हणाले.
 बँकेच्या या गैरजिम्मेदारी, बेजबाबदार वर्तणुकीस   मनमानी कारभाराला  बँक व्यवस्था जबाबदार असून केवळ ग्राहकाचा वेळ मारून नेने एवढेच नव्हे तर मानसिक तणाव आणि आर्थिक टंचाईला ग्राहकांना सामना करावा लागला. यावरून गोरगरीब ग्राहकांची  लचके तोडणारी ही बँक असल्याचा आरोपही ग्राहकांनी केला.
  शकील पठाण यांनी आरोप केले आहे की, (आरबीआय)   भारतीय रिझर्व बँक नियमांचे उल्लंघन करून  गोल्ड लोन तारण योजनेच्या नियमाचे उल्लंघन केले आहे.
  शकील पठाण म्हणाले की, याबाबतची प्राथमिक शिकायत पोलीस स्टेशन तथा आरबीआय क्षेत्रीय कार्यालयात करणार असल्याचे सांगितले.
  बँकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले असून या प्रकारच्या ग्रामीण आणि अर्धशरी भागात काही  खाजगी बँका, सोने तारण या नावाखाली ग्राहकांना नहाक त्रास देत असतात. या संदर्भातली नागरिकात आणि ग्राहकांमध्ये आपली चर्चा सुरू असून जर एखादी प्रतिष्ठित बँक अशा प्रकारचे व्यवहार करत असेल तर  सामान्य जनतेचे काय?
 अशा बँकांवर वेळीच कारवाई झाली नाही तर!  सोने तारण योजनेवरचा नागरिकांचा बँकेच्या सुरक्षिततेवर विश्वास  राहणार नाही.