तुकुम येथे 194 वी संविधान शाखा संपन्न, ५० च्या वर नागरिकांची उपस्थिती
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महापुरुषांच्या विचाराचे स्वाभिमानी लोक अर्थात नागरिक निर्माण करण्यासाठी सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट च्या वतीने 15 नोव्हे 2021 ला कोरोना काळात सुरु केलेल्या संविधान शाखा उपक्रमा अंतर्गत आज चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरातील शिवनेरी गार्डन येथे 194 व्या संविधान शाखेचे यशस्वपणे आयोजन करण्यात आले. यात शहराच्या विविध भागातील 50 वर नागरिकांनी सहभाग घेतला. सकाळी 8.30 लासुरु झालेला संविधान शाखेतील सहभागी नागरिकांचा सहभाग सकाळी 9.40 पर्यंत चालला. जनगनमन राष्ट्रगीताने सुरु झालेली संविधान शाखेत प्रामुख्याने संविधानाने दिलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद या मुल्यामुळे भारतीय समाजात राजकीय, सामाजिक व आर्थिक समानता प्रस्थापित करण्याचा भाग म्हणून राजकीय सत्तेतील राजकीय पक्षांनी उपयोग केला. पण वर्तमानातील केंद्र व राज्य सरकार ही सामाजिक, राजकीय व आर्थिक घडी विस्कळीत करण्याचा अर्थात नागरिकांचे संविधानिक अधिकार संपविण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाला हाताशी धरून करत आहे. परिणामी जुवघेणी महागाई आली असून सामान्य जनतेचे हाल होत आहे. शिक्षित होऊन लायक बनलेल्या तरुणांना सरकारी नोकऱ्या देने बंद केले आहे. खाजगी कारखानदाराकडे अत्यल्प मोबदला घेऊन तरुणांना काम करावे लागत आहे. दुसरीकडे राज्य व केंद्र सरकारच्या विविध विभागातील लाखो पदे रिक्त आहेत. ती पदे भरल्या जात नसल्याने शिक्षित तरुणांना नोकरीं दिली जात नसल्याने नागरिकांची असंख्य कामे खोळंबून आहेत. तरुणांची लग्न होत नसल्याने तरुण वर्ग नैराश्यात आहे. दुसरीकडे नशेच्या वस्तूंची खुले आम विक्री सुरु असल्याने देशातील तरुण पिढीला सरकार बर्बाद करत आहे. शिक्षण महाग करून सामान्य जनतेला ज्ञान वंचित करण्याचा प्रयत्न होत आहे. ज्ञान वंचित तरुणांची पिढी उद्या धन वंचित होण्याची भीती निर्माण झाली आहे. भारतीय समाज ज्ञान वंचित व धन वंचित करून सरकारच जनतेला गुलाम बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. तेव्हा नागरिकांनी सावध राहून भारतीय संविधानाने दिलेले हक्क अधिकार मिळविण्यासाठी गुलाम करू पाहणाऱ्या सरकार व राजकीय पक्षाला धडा शिकविण्यासाठी अर्थात त्यांना सत्ते पासून हटविण्यासाठी ओबीसी, एससी, एसटी, मायनारिटी समाजाने व भारत देशाप्रति प्रेम व जिव्हाळा असलेल्यानी एकत्र येऊन अन्याय अत्याचार करणाऱ्या सत्तेतील लोकांना हुसकावून लावण्यासाठी तयार व्हावे व लोकांभिमुख कार्य करणारी माणसे सत्तेत पाठविण्याचा प्रयत्न करावा आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी तयार रहावे असे उपस्थितातील चर्चेच्या सुरा वरून सर्वांना कळले.
सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चे जेष्ठ संघटक मा. पी एम जाधव सरांनी भोंदू लोक समाजात अंधश्रद्धा पसरवून चमत्काराचे नावाने जनतेचे शोषण कसे करतात याचे प्रयोग करून दाखविण्यात आले. संविधान शाखेच्या समारोप प्रसंगी विध्यार्थ्यांच्या एका मोठया ग्रुप ने सहभागी होऊन चमत्काराचे नावाने ठकबाजी करणारे भोंदू च्या कृतिमागे वैज्ञानिक कारणे सांगितली व प्रयोग करून दाखविले. यात बिना तेल व बिना वातीने पाण्याचा दिवा पेटविणे, खिळ्याच्या पाटीवर उभे राहणे व बोटावर चामडी बेल्ट बिना आधाराने ठेवणे ई प्रयोग करून दाखविले. शेवटी संविधानाच्या उद्धेश पत्रिकेचे सामूहिक वाचन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित राष्ट्र वंदनेचे सामूहिक गायन करण्यात आले. उपस्थितांच्या परिचयाने समारोप करण्यात आला.
