जिल्ह्यात प्रतिबंधित अन्नपुरवठ्याला अभयदान कुणाचे?
संवेदनशील पदावर मुदतीनंतरही सात-कर कार्यरत!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासक विभागातील कार्य कर्तुत्वावर आता सर्रास प्रश्न निर्माण होत आहे. राज्यात सुगंधी तंबाकावर बंदी असताना मात्र चंद्रपूर जिल्ह्यात सर्रास पान टपऱ्यावर, गुटखा व सुगंधी सुपार्याची विक्री होत आहे. जिल्ह्यातील अनेक वेळा
जयसुख, रवी, वसीम, ठक्कर यांच्यावर कारवाऱ्याहूनही सुद्धा येथील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुगंधी तंबाखूची तस्करी करणाऱ्याला अभयदान मिळत आहे.परिस्थिती जशीच्या तशी असून मागील चार पाच वर्षापासून शासनाच्या नियमाला बगल देऊन येथील संवेदनशील पदावर जी डी सात - कर सारखे अधिकारी ठाण मानून बसले आहेत. यांच्या आशीर्वादाने जिल्ह्यात सर्रास अन्य व औषध प्रशासन विभागाची नाचक्की होत आहे. एकंदरीत
या विभागाच्या अधिकाऱ्याकडून खुली सूट मिळतं की काय? असा प्रश्न साता उपस्थित होत आहे.
शाळा, कॉलेज परिसरात गुटखा व सुगंधी सुपारी विक्रीवर बंदी आहे. तरीही परिसरातील पान टपरीवर गुटखा सुगंधी सुपारीची सर्रास विक्री होत असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निदर्शनास आले आहे. अनेकदा जप्ती व फौजदारी कारवाई केल्यानंतरही दुकानदारांकडून विक्री होत असल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या विक्रीला चाप लावण्यासाठी गुटख्यासह सुगंधी सुपारी विक्रेत्यांना मकोकोच्या कक्षेत आणण्याच्या हालचाली सुरु असून विधी व न्याय विभागाकडे याचा प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली.
गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी, खर्रा व मावा यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री संपुष्टात आणण्यासाठी एफडीएने नावापुरत्याच कारवाया केल्यात की काय? असा संशय यायला लागला आहे.
