सावकारी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी...!


सावकारी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी...!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर (नागभीड) :-
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पुढे आली आहे.कर्जाचा फासात अडकलेल्या शेतकऱ्याला कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली.या क्रूर प्रकाराणे महाराष्ट्र हादरला आहे.जिल्हातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथुर गावात हा प्रकार घडला.बळीराजाचा वेदना बघून दगडालाही पाझर फुटेल.मात्र सरकार, प्रशासनाला बळीराजाचे आभाळाएवढे दुःख कधी दिसलेच नाही. केवळ आकड्याचा खेळ पुढे ठेवून सरकार टाळ्या पदरी पाडत असते. चंद्रपूर जिल्हातील या कर्जबाजारी शेतकऱ्याची वेदना आभाळाला भिडणारी आहे. सावकारी कर्जाचा जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याचा वेदनादाई प्रसंग ओढवीला. या शेतकऱ्याचे नाव आहे रोशन सदाशिव कुडे. ते चंद्रपूर जिल्हातील नागभीड तालुक्यातील मिंथुर गावातील रहिवाशी आहे.निसर्गाला जिंकणारा बळीराजा सावकारीला पुरता हरला आहे.रोशन यांच्याकडे चार एकर शेती आहे. या शेतीवरच त्यांचा कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालतो.निसर्गाचा लहरीपणामुळे शेती फायदेशीर ठरली नाही. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले. दुग्ध व्यवसायातून थोडी मिळकत होईल म्हणून त्यांनी दुधाळ गाई खरेदी केल्यात. यासाठी त्यांनी दोन सावकाराकडून 50-50 हजार रुपये घेतले. येथेही त्यांना नशिबाने धोका दिला. खरेदी केलेल्या गाई मरण पावल्यात.त्यात शेतीही पिकेना. कर्जाचा डोंगर वाढत गेला. सावकार घरी येऊन नको ते बोलू लागलेत.कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी दोन एकर जागा विकली. ट्रॅक्टर आणि घरातील सामान विकले.मात्र कर्ज काही संपेना. एक लाखाचे 74 लाखावर गेले. शेवटी कर्ज घेतलेल्या एका सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला.एका एजंटने रोशन कुडे यांना कलकत्ता येथे नेले. कुडे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर कंबोडिया येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली. ही किडनी कुडे यांनी आठ लाखाला विकली.

काय म्हणाले रोशन कुडे

व्ही. ओ.:- अन्याय झाला की सामान्य माणूस पोलीस स्टेशन गाठतो. येथे न्याय मिळेल ही अपेक्षा असते. मात्र कुडे यांच्याबाबत तसं घडलं नाही. कुडे यांनी सांगितलं, पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षकांकडे मी तक्रार दिली. मात्र त्यांच्याकडून कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिसांनी वेळीच लक्ष दिलं असतं तर कुडे यांच्यावर दुदैवी प्रसंग ओढवीला नसता. मात्र पोलीस स्थानक ब्राह्मपुरी येथे
रोशन कुडे यांच्यावर देखील गुन्हा दाखल असल्याचे बोलल्या जात आहे.