चंद्रपुर झेडपीतही 'त्या' बिडिओच्या अटकेचे पडसाद



चंद्रपुर झेडपीतही 'त्या' बिडिओच्या अटकेचे पडसाद

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
वर्धा जिल्ह्यातील आ-र्वी येथील गट विकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्या मनरेगा प्रकरणातील अटकेविरुद्ध जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी तीव्र निषेधाची भूमिका घेत दोन दिवसांच्या सामूहिक रजेची घोषणा केली आहे. दि.4 व 5 डिसेंबर (गुरुवार व शुक्रवार) दरम्यान ही रजा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचे पडसाद चंद्रपूर जिल्हा परिषदेत दिसून आले आहेत.
जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीतील गट विकास अधिकारी, तथा जिल्हा परिषद मधील अधिकाऱ्यांनी आज सामूहिक रजा स्वीकारल्याचे दिसून आले.
२ डिसेंबर रोजी उशिरा रात्री सुनीता मरसकोल्हे यांना अटक करण्यात आली. मात्र या कारवाईपूर्वी
कोणतीही प्राथमिक प्रशासकीय चौकशी न करता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता तातडीने ही पावले उचलली गेली, असा आक्षेप नोंदवण्यात आला आहे. महिला अधिकाऱ्यांबाबत आवश्यक असलेली प्रक्रिया, कायदेशीर दक्षता आणि संवेदनशीलता पाळली गेली नाही, या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी त्या घटनेच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये ही काम बंद रजा स्वीकारल्याचे दिसून आले.गुरुवार (दि.४) आणि शुक्रवार (दि.५) रोजी सर्व वरिष्ठ अधिकारी, गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी यांनी सामूहिक रजा जाहीर केली आहे.
सर्व अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्याकडे निवेदन दिले. निवेदन देताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य नूतन सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मीना साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता मच्छिंद्रनाथ धस, भद्रावतीचे गटविकास अधिकारी आतुषोश सपकाळ यांच्यासह जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, यावेळी उपस्थिती होती. सहायक गटविकास अधिकारी आदींची उपस्थिती होती.

काय आहेत मागण्या?
अपहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यापूर्वी विभागीय चौकशी बंधनकारक करावी, अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी शासनाची पूर्वपरवानगी अनिवार्य करावी, ५ डिसेंबरपर्यंत मागण्यांचे निराकरण न झाल्यास ६ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रातील गटविकास अधिकारी बेमुदत कामबंद आंदोलनावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.