हिवाळी अधिवेशनात झेडपीच्या 'कॅफों'ची होणार उचल बांगडी ?




हिवाळी अधिवेशनात झेडपीच्या 'कॅफों'ची होणार उचल बांगडी ?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा परिषदेतील वादग्रस्त राहिलेले मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अतुल कुमार गायकवाड यांची नागपूर हिवाळी अधिवेशनात उचल बांगडी होण्याचे संकेत आहेत. यांच्या संबंधात समितीच्या चौकशी अहवाल शासनाकडे सादर झाला असून त्या अहवालानुसार पुढील कारवाई होणार आहे. त्यांच्या बाबतच्या संदर्भाच्या गंभीर तक्रारीची दखल वित्त विभागाने घेऊन बदली केली होती. त्यानंतर कॅफोंविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एक समितीने त्यांची चौकशी केली असून या समितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. अधिवेशनादरम्यान या अहवालावर कारवाई होण्याचे संकेत आहेत.
चंद्रपूर जिल्हा परिषद मधील मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री अतुलकुमार गायकवाड यांना संचालक, लेखा व कोषागार मंत्रालय मुंबई (म.रा.) यांनी जिल्हा परिषद मधील कॅफो या पदावरून बदली करण्यात आली होती.
मात्र 'मॅट' मध्ये धाव घेतल्यानंतर काही दिवसासाठी त्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली असून दिवाळीच्या
सुट्ट्यानंतर या प्रकरणावर निर्णय दिला जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहेत.
आल्या आल्या त्यांनी कर्मचाऱ्यांवर आपला वचक निर्माण करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लाऊन त्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांना धारेवर धरणे, कर्मचाऱ्यांचे वारंवार टेबल बदलविने. कर्मचारी यांना अरेरावीच्या भाषेत बोलून मानसीक त्रास देणे इत्यादी. त्यांच्या कार्यप्रणालीमुळे कर्मचारी त्रासून गेले. या बाबतची बातमी यापूर्वी "दिनचर्या" या वृत्तपत्रातून 2023 मध्येच प्रकाशित करण्यात आली होती. परंतु तत्कालीन सी.ई.ओ. श्री विवेक जॉन्सन यांनी वेळीच दखल घेतली नाही. याचाच गैरफायदा श्री गायकवाड यांनी घेऊन आपला मनमानी कारभार सुरू केले.
काही दिवसापूर्वी वित्त विभागात लेखाधिकारी वर्ग 2 हे कार्यरत असतांना श्री गायकवाड यांनी त्यांचा चार्ज त्यांना न देता सीईओ यांच्या अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या अधिकाराचा वापर करून ,स्वतःच्या सहीने परस्पर आदेश काढून वर्ग 3 च्या आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना लेखाधिकारी 1 व 2 चा चार्ज देऊन त्यांना वारंवार अपमानित करून त्यांचे मानसिकतेचे खच्चीकरण करून ते डिप्रेशन मध्ये जाण्या इतपत त्रास दिले . शेवटी त्रासुन संबंधित अधिकारी यांनी सीईओ साहेब यांना प्रत्यक्ष भेटून श्री गायकवाड बाबत आपबिती सांगून तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत सीईओ यांनी आपल्या सहीचे तात्काळ आदेश काढून त्यांचा चार्ज त्यांना परत देऊन न्याय दिला.
काही महिन्या अगोदर नव्यानेच सेवेत रुजू झालेल्या एका नवशिक्या कर्मचाऱ्याला नाहक त्रास दिल्यामुळे त्यांनी सुद्धा त्रासुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून पत्रात मला कॅफो श्री गायकवाड यांनी मुद्दाम मानसिक त्रास देत असल्यामुळे माझी मानसिक स्थिती खराब होत चाललेली आहे. त्यामुळे माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार हे फक्त श्री अतुलकुमार गायकवाड राहील. असे कळविले होते. सदर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन कर्तव्यदक्ष असलेले श्री पुलकित सिंग सीईओ, यांनी तात्काळ त्याला दुसऱ्या विभागात तात्पुरती बदली करून न्याय दिले.
कॅफो हे स्वतःच्या केबिनमध्ये सीसीटीवी कॅमेरे न लावता मुद्दाम फक्त वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांवर सी.सी.टीवी कॅमेरे लाऊन त्यांना धारेवर धरले आहे. स्वतःला मात्र तिसऱ्या डोळ्यापासून कोसो दूर ठेवले आहे. वर्ग दोन च्या आधीकाऱ्याच्या कॅबिन मध्ये एसी (AC ) न लावता मुद्दाम आपल्या मर्जीतील काही वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांसाठीच 2 एसी ची सुविधा करून दिल्यामुळे दुजाभाव झाल्याची नाराजी कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त केल्या जात आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे दोन वर्षापासून सीआर न देने, परिविक्षाधीन कालावधी संपलेल्या कर्मचारी यांना सेवेत नियमित न करणे, सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध न करणे, , कर्मचारी यांचे वारंवार टेबल बदलविणे, मागील दोन वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारण सभा न घेणे. इत्यादी समस्या सोडविणे बाबतचे निवेदन लेखा कर्मचारी संघटनेने मा.मु.का.अ. यांना दिले होते. या संदर्भात दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वारंवार कॅफो यांना कडक सूचना दिले होते. परंतु त्या सर्व सूचनांना देखील गायकवाड यांनी बगल देऊन आपले मनमानी कारभार सुरूच ठेवले. नंतर या सगळ्या प्रकाराबाबत काही कर्मचाऱ्यांनी आमदार मा.श्री सुधाकर अडबाले यांच्याकडे काही महिन्यांपूर्वीच तक्रारी केल्या होत्या. त्याची आमदार साहेबांनी दखल घेऊन कॅफो वर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद, आणि महाराष्ट्र शासनाकडे केली होती. तसा पाठपुरावाही सुरू होता. दरम्यान २ ऑक्टोबर रोजी परत काही कर्मचाऱ्यांनी कॅफो गायकवाड यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. कॅफो च्या तक्रारीची आमदार सुधाकर अडबाले यांनी तात्काळ दखल घेऊन शासनाचे लेखा व कोषागार मंत्रालयाच्या प्रधान सचिव सौ.रिचा बागला मॅडम यांच्याशी थेट संपर्क साधून हा प्रकार सांगितला. प्रधान सचिवांनी याची तुरंत गंभीर दखल घेत 9 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या मंजुरीने तुरंत त्यांची बदली करून एकतर्फी कार्यमुक्त केले. 
श्री गायकवाड हे जिल्हा परिषदेच्या  वित्त विभागात आले तेंव्हापासून  ते कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त राहिले. आता समिती चौकशीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला असून अहवालानुसार पुढील कारवाई होणार आहे. याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान येता आठ डिसेंबर पासून नागपूरला सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 'कॅफों' चा मुद्दा चांगला गाजणार असून त्यांची उचलबांगडी होणार का? याकडे लक्ष लागले आहे.