चंद्रपुरातून प्रतिदिन रेल्वे 'या'शहरात जाण्यासाठी आंदोलन
..या समस्येकडे लोकप्रतिनिधींची उदासीनता- रेल प्रवासी सेवा संस्था
पत्रकार परिषदेत चंद्रपूर रेल प्रवाशी संस्थेची मागणी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : चंद्रपूर रेल प्रवाशी संस्थेने चंद्रपुरातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांना घेवून आज दि.४ डिसेंबरला श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत रेल्वे प्रवाशांना विविध समस्यांना सामना करावा लागत असल्याचे सांगितले. चंद्रपूर रेल्वे स्टेशन वरून नियमित गाडी जाण्यासाठी यापूर्वी सुद्धा आंदोलन करण्यात आले होते. परंतु रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही.
चंद्रपूरहून पुणे आणि मुंबईला जाणार्या गाड्या अजूनही आठवड्यातून एकादाच धावत आहेत.मात्र ही रेल्वे गाडी नियमित प्रति दिवस सुरू करावी, तसेच कोलकाता जाण्यासाठी चंद्रपुर वरून रेल्वे गाडी सुरू करावी अशा विविध मागण्यांना घेवून अनेकदा निवेदने दिले मात्र याकडे कुणीही लक्ष दिले नसल्याने या चंद्रपुर रेल्वे प्रवाशांच्या समस्या निकाली न निघाल्यास सहा डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी रेल्वे स्टेशन समोर चंद्रपूर रेल प्रवासी सेवा संस्था यांच्याकडून आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे गांभीर्याने घेत नसल्याची बाब त्यांनी बोलून दाखवली.
यावेळी पत्रकार परिषदेला चंद्रपूर रेलवे प्रवासी सेवा संस्थेचे अध्यक्ष रमणीक चौहान, दामोधर मंत्री, नरेंद्र सोनी, पुनम तिवारी, अनिश दिक्षित, डॉ. मिलिंद दाभेरे, महावीर मंत्री, रमेश बोथ्रा, अशोक रोहरा आदीसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
