चंद्रपूरच्या वेदश्री मॅकलवार हिचे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक!





चंद्रपूरच्या वेदश्री मॅकलवार हिचे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, १० डिसेंबर २०२५: चंद्रपूरच्या क्रीडा जगतात एक अत्यंत अभिमानास्पद घटना घडली आहे. येथील कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल मंदिर व्यायाम शाळा, चंद्रपूर येथील १४ वर्षांखालील कुस्तीपटू वेदश्री महेश मॅकलवार हिने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
वेदश्री माकलवार हिने ८ ते ११ डिसेंबर २०२५ या कालावधीत ओरस जिल्हा सिंधदुर्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेच्या ५० किलो वजन गटात तृतीय क्रमांक (कांस्यपदक) मिळवला आहे.
> कठोर मेहनत, जिद्द, बुद्धी आणि कुस्तीच्या शास्त्रोक्त बळाचा अचूक प्रयोग करत तिने हे यश संपादन केले आहे.
वेदश्रीच्या या यशामागे विठ्ठल मंदिर व्यायाम शाळेतील प्रशिक्षक श्री.भुपेंन्द्र अवघडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच तिचे वडील महेश मॅकलवार, यांचे विशेष योगदान आणि मार्गदर्शन होते.
कौतुक आणि अभिनंदन:
वेदश्रीच्या या शानदार कामगिरीमुळे विठ्ठल मंदिर व्यायाम शाळेसाठी , विद्या निकेतन हायस्कुल आणि संपूर्ण चंद्रपूर शहरासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे.
जय बजरंग व्यायाम व क्रीडा प्रसारण मंडळ बाबुपेठ , येथिल सदस्यांनी वेदश्रीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. व वेदश्री मॅकलवार हिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा! तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चंद्रपूरचे नाव उज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या प्रसंगी जय बजरंग व्यायाम व क्रीडा प्रसारण मंडळाचे सदस्य श्री. सुरेश मॅकलवार, शिर्षल पोटदुखे , सचिन आक्केवार,उमंग हिवरे, योगेश जिवतोडे, हर्षल पोटदुखे , पराग गोंड्रालवार व शंकर नवले हे उपस्थित होत.