चंद्रपुरातून प्रतिदिन रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी तीन दिवसीय उपोषण जनआंदोलन सुरू




चंद्रपुरातून प्रतिदिन रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी तीन दिवसीय उपोषण जनआंदोलन

..या समस्येकडे लोकप्रतिनिधींची उदासीनता- रेल प्रवासी सेवा संस्था

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :
चंद्रपूर रेल प्रवाशी संस्थेने केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा कार्यालय समोर सहा डिसेंबर पासून तीन दिवसीय उपोषण जनआंदोलन सुरू केले आहे. सरकारचे लक्ष वेधण्याकरता हे आमचे उपोषण जनआंदोलन आहे. देशात केंद्रात आणि राज्यातही भाजप सरकार आहे. चंद्रपूर जिल्हा सर्वीकडे भौगोलिक दृष्ट्या विकसित झाला असला तरी या ठिकाणी मुंबई, पुणे कलकत्ता, या शहरात जाण्याकरिता प्रतिदिन रेल्वे गाडी नसल्याने इथून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्रवाशांना फार अडचणीला सामोर जावे लागत आहे. चंद्रपूर हे रेल्वेचेमध्ये सेंटर असल्याने इथूनच सर्वीकडे पूर्व रेल्वे,मध्य रेल्वे अशा सर्व गाडया जात असतात. परंतु पुणे, मुंबई कलकत्त्याला जाण्यासाठी चंद्रपूर वरून नियमित गाडी नाही.
कन्याकुमारी पर्यंत जाणाऱ्या सगळ्या गाड्या इथून जातात. केंद्रा सरकार, राज्य सरकार नेतृत्व असतानाही चंद्रपूर अजून रेल्वेच्या बाबतीत का मागासलेले आहे.
सरकार हेतू पुरस्कार दुर्लक्ष करत आहे. सरकारचे लक्ष वेदन्यासाठी जनआंदोलनाच्या भावनेतून सरकार समोर जठील समस्या मांडायचीआहे.
कुठल्याही पार्टीचा लोकप्रतिनिधी असो त्यांनी आंदोलनात सहभागी दर्शवायला हवा, रस्त्यावर उतरायला हवे. जे स्वतःला राजकीय नेते समजतात त्यांनी या जनआंदोलनात सहभाग दर्शवाला हवे असे आज आंदोलनात आपले मत व्यक्त करताना डॉ. विजय आईंचवार म्हणाले.
आमचे नेते कुठेतरी मागे पडतात. परंतु त्यांचा आम्हाला  विकास दिसत नाही.  लोकांच्या मतावर ते निवडून येतात, परंतु ते आपल्या मतदार क्षेत्राच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मागे पडतात.चंद्रपूर हे प्रदूषण युक्त झाले आहेत चंद्रपूर कडे दुर्लक्ष होत चाललेले आहेत.  हे जनतेच्या हितार्थ संपूर्ण जनआंदोलन आहे, विद्यार्थी, व्यापारी व सर्वसामान्य माणसाच्या सुख सुविधासाठी चंद्रपूरला रेल्वे  उपलब्ध करून द्यावी आणि आमचे जे प्रतिनिधी आहेत या प्रतिनिधींनी सुद्धा आमच्या सोबत सहभाग दर्शवावा असे ते बोलले.  यायला पाहिजेच नाहीतर आमच्या सोबत रस्त्यावर उतरायला पाहिजे.अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे.  आजी-माजी आमदार -खासदार स्वतःला नेते समजतात परंतु शहराचा विकास न दिसता, स्वतःचा विकास मात्र  भरभराटीस  झाल्याचे दिसून येते आहे.असे आंईचवार म्हणाले. म्हणून राष्ट्रीय नेता कुठल्याही पक्षाचा असो जिल्ह्याच्या विकासासाठी सगळे एकत्र येऊन या  उपोषण जनआंदोलनाला  सहभागी व्हावे.
या  उपोषण  जनआंदोलनात चंद्रपूर रेलवे प्रवासी सेवा संस्थेचे अध्यक्ष रमणीक चौहान,  डॉ. विजय आंईचवार, डॉ.अशोक जीवतोडे,दामोधर मंत्री, नरेंद्र सोनी, पुनम तिवारी, अनिश दिक्षित, डॉ. मिलिंद दाभेरे, महावीर मंत्री, रमेश बोथ्रा, अशोक रोहरा आदीसह  शेकडो लोकांची उपस्थिती होती.