शिवनीचोर रेती घाटावरून अवैद्य रेतीची तस्करी ! शासनाच्या महसुल रेती तस्करांच्या घशात !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर तालुक्यातील शिवनीचोर या गावातील वर्धा नदी पात्रातून निघणाऱ्या रेतीचा महसूल ग्रामपंचायत पासून तर शासनापर्यंत प्राप्त व्हावा म्हणून या नदीपात्रातील 336 ,333 , 332, 383, 299, 306, 314 या गट नंबर वरून रेती उपसण्यासाठी शासनाकडून लिलाव करण्यात आले. या नदीपात्रातील आराजी2.40 असून या नदीपात्रातून 8480 ब्रास रेती उत्खलन शासनाकडून करण्याची परवानगी असून त्यात प्रति ब्रास 600 रुपये याप्रमाणे 50 लाख 88 हजार रुपयाची रेती काढण्याचा शासन निर्णय झाला आहे. त्या नदीपात्रातील लांबी400 से मिटर रुंद 60 m, आणि एक फूट खोल अशा प्रकारची रेतीचे उत्खनन करण्याची शासन परवानगी असून
त्या ठिकाणी आरवड येथील अवैद्य रित्या रेती तस्करांनी शासन नियमाला पायदळी तुडवून सर्रास रेतीची रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रेती उपसण्याचा सपाटा सुरू केला आहे. संपूर्ण महसूल तस्करांच्या घशात जात आहे.
हा रेतीघाट प्रस्थापित असून या रेती घाटाचा लिलाव सुद्धा झाला असून, सुरू होण्याच्या अगोदरच येथील रेती तस्करांनी शासनाचा लाखोचा महसूल डुबवून रेतीची चोरी होत असल्याची बाप समोर येत आहे.
या रेती घाटावर जाणारा रस्ता महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी खोदून बंद केला होता. परंतु रेती तस्करांनी त्या ठिकाणी औवरबर्डन टाकून रस्ता जैसा तसा केला. आता या रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.
एकीकडे महाराष्ट्र शासनाने रेती तस्करीवर कठोर कारवाईचे निर्बंध दिले असताना, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात रेती तस्करी कडे सर्रास महसूल विभागाकडून दुर्लक्ष केल्या जात असल्याची बाब समोर येत आहे.
