विधिमंडळाच्या तारांकित प्रश्नात झेडपीच्या कॅफोची अनियमिततेची चौकशी करून कारवाईचे आदेश
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्हा परिषद चंद्रपूर येतील येथील मुख्य लेखा वित्त अधिकारी अतुलकुमार गायकवाड यांच्या बदली विषय न्यायप्रविष्ठ आहे. तसेच आमदार सुधाकर अडबाले यांनी केलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने दोषारोप अंतिम करून,म.ना.से. (शि.व.अ) नियम१९७९ नुसार चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती परिपत्रकाद्वारे हिवाळी अधिवेशनातील विधीमंडळाच्या तारांकित प्रश्नात संबंधित मंत्र्यांनी दिले.
जिल्हा परिषद, येथील मुख्य लेखा व वित्त अधिकारी त्यांच्या वागणुकीमुळे व कार्यपध्दतीमुळे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी व अन्य कर्मचारी यांना त्रास देत असून याबाबत लोकप्रतिनिधींनी शासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्या संदर्भात 12 डिसेंबरला आमदार सुधाकर अडबाले यांनी उपमुख्यमंत्री यांना या तक्रारीबाबत खुलासा करण्यासाठी तारांकित प्रश्न लावला होता.
जिल्हा परिषद, चंद्रपूर येथील मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे सतत उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी व अन्य कर्मचारी यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींकडे सी.सी.टी.व्ही. कॅमेराच्या माध्यमातून लक्ष ठेवून असतात,
अशा विविध तक्रारी संघटने कडून काँफो संदर्भात प्राप्त झाल्या होत्या. त्यांच्या अनियमिततेची चौकशी करण्याबाबत अनेक तक्रारी होऊन देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई न होण्याची कारणे काय आहेत,
यांच्याविरुध्दच्या तक्रारीनुसार शासनाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर या पदावरुन कार्यमुक्त करुन सहसंचालक, लेखा व कोषागारे, नागपूर यांचे कार्यालयात हजर होण्याचे आदेश दिले होते.
सदर शासन आदेशाविरुध्द त्यांनी मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, खंडपीठ नागपूर येथे मूळ अर्ज क्र. १०२०/२०२५ दाखल केला आहे. त्यावर १३/१०/२०२५ रोजीच्या सुनावणीमध्ये मा. न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असून कॉफोनी मॅटमध्ये जाऊन काही दिवसासाठी पदभार स्वीकारला असला तरी, झेडपीत सध्या या
मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची चांगलीच चर्चा होत असून या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
