ग्रा. पं. बोर्डा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत हळदीकुंकवाचे आयोजन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
दिनांक १४/१/२०२६ रोजी ग्रामपंचायत बोर्डा जिल्हा चंद्रपूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत मकर संक्रांतीचे औचित्य साधून महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले होत्या. त्या म्हणाल्या की, महिलांनी स्वतःचे पायावर उभे राहून समाजाचे मुख्य प्रवाहात येण्यासंदर्भात आव्हान केले. माननीय अल्काताई आत्राम यांनी महिला सक्षमीकरणाकरिता शासन कोणत्या योजना राबवीत आहे याबाबत प्रकर्षाने मार्गदर्शन केले. कार्यक्रमाकरिता माननीय संगीता भांगरे मॅडम यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलाना सक्षमीकरणाचा संदेश दिला. कार्यक्रमात हळदी कुंकवा सोबत महिलांना वाण म्हणून स्वच्छता साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत बोर्डाचे उपसरपंच दीपक खनके यांनी केले. सरपंच पल्लवी तोडासे,
या कार्यक्रमाच्या यशस्वीच करिता ग्रामपंचायत सदस्य, सुनील देवगडे, चेतन मेश्राम, सुनिता आत्राम, जयश्री देवगडे, स्मिता सिडाम, संतोष आत्राम,संगिंता पांडव,
ग्रामपंचायत अधिकारी अभय धवणे, कर्मचारी, युवक युवती, कार्यकर्ता यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. या क्रमांकासाठी बोर्डा येथील महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
