काँग्रेसने निष्ठावंतांना डावल्याने खा. धानोरकर, आ. वडेट्टीवार समर्थकातच उद्रेक वाढला!





काँग्रेसने निष्ठावंतांना डावल्याने खा. धानोरकर, आ. वडेट्टीवार समर्थकातच उद्रेक वाढला!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देताना निष्ठावंतावर अन्याय करून एक लांबी असलेल्या आयारामांना संधी दिल्याने काँग्रेस खेम्यात चांगलाच उद्रेक वाढला आहे. वाघ अजूनही जिंदा आहे असे म्हणणारे, आमदार विजय वडेट्टीवार यांचे चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक तिकीट वाटपात वर्चस्व राहिले नसल्याने त्यांच्या समर्थकात नाराजीचा सूर असून त्यांना म्हणावे लागले की, आता वडेट्टीवाराचे काही चालत नाहीत. कांग्रेसची माजी आमदार,जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबले, यांच्या मनमर्जीतील उमेदवारांना देऊन मोठ्या आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही पत्रकार परिषदेतून करण्यात आला होता. त्यात निष्ठावंत असलेल्या पैकी नंदू नागरकर, प्रशांत दानव, सुनिता लोढिया, सकीन अन्सारी, विना खनके, अशोक नागापुरे, अशा दिग्गज माजी नगरसेवकांना डावलण्यामागे नेमकी काय भूमिका? हे पक्ष श्रेष्ठनेतृत्वांना शोधणे आवश्यक आहे. निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांचा उद्रेक वाढला .या सर्व उमेदवारांनी पक्षाविरोधात बंडखोरी करून बंड पुकारून उमेदवारी दाखल केली आहे.झालेल्या तिकीट वाटपावरून काँग्रेस गोठ्यात कुणाचे वर्चस्व आहे.हे जग जाहीर झाल्याचे दिसून आले.
होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत चंद्रपुरात झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोडशोमुळे भाजपच्या दोन दिग्गज नेत्यात कटुता असलेली संपुष्टात आल्याचे दिसून आले.
एकंदरीत चंद्रपुरातील विजय संकल्प यात्रेने भाजपा  खेम्यात  उत्साह दिसून आला. आता येणाऱ्या काळात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार कितपत यशस्वी ठरतात यावर काँग्रेसचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. असे जानकाराचे मत आहे!