मनपातील अमृत योजनेच्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका, दोषी अधिकाऱ्यासह अभियंत्यावर निलंबराची कारवाई करा- महाविकास युवक आघाडी




मनपातील अमृत योजनेच्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका, दोषी अधिकाऱ्यासह अभियंत्यावर निलंबराची कारवाई करा- महाविकास युवक आघाडी

१ जूनला मनपावर 'घागरफोडो' आंदोलन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर महानगरपालिकेत मागील दोन वर्षापासून अमृत जल योजना दोनचे काम सुरू आहेत. या योजनेचे काम 218 चे असून मे लक्ष्मी कंट्रक्शन या कंपनीला देण्यात आले. सदर कंत्राटदाराला वर कार्ड मध्ये दिलेल्या नियम अटी शर्तीला बंधन ठेवून पालिकेत काम करणाऱ्या काही अधिकारी, अभियंते तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन अतिशय गुणवंत्ताहीन , भोंगळ, निष्कृष्ट दर्जाचे शहरात कामे केली आहेत. याबाबतच्या अनेक लेखी तक्रारी, प्रत्यक्षात भेटून राज्याचे उपमुख्यमंत्री, तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही तक्रार दिले, नगर विकास च्या अप्पर मुख्य सचिवालाही तक्रार देऊन कुठलीही कारवाई होत नसल्याने, मागील दोन ते दोन अडीच वर्षापासून चंद्रपूर शहरातील जनता पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. जबाबदार महानगरपालिका, कंत्राटदार, आणि जबाबदार अधिकारी हे आहेत. चंद्रपूरकरांना वेटीस धरुण नाहक त्रास देणाऱ्या प्रशासन व कंत्राट दराच्या विरोधात कारवाई व्हावी यासाठी आज पत्रकार परिषदेतून महाविकास युवक आघाडी शिवसेना, युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष संजय ठाकूर, बबलू इसा, कलाकार मल्लारप, सुरज चव्हाण, राजेश कुमार, समिर खान, अमोल मेश्राम व गौरव रॉय यांची उपस्थिती होती.
अनेक ठिकाणी नळाचे पाईप लाईन तर लावण्यात आले परंतू त्याला पाणी मात्र अजुनपर्यंत आले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला.
नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. सदर खड्डे बुजवितांना मात्र कंत्राटदाराने हयगय केल्याने व निकृष्ट दर्जाचे सामाना वापरल्याने अनेक भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे अनेकदा अपघातांनाही नागरिकांना सामोरे जावे लागले. त्यानंतर अनेक भागात नळाचे पाईपलाईन टाकण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी आज ना उद्या पाणी मिळेल या आशेवर समाधान व्यक्त केले. परंतू त्यांची ही आशा काही दिवसातच फोल ठरली. आजतागायत अनेक भागात पाण्याचा एक थेंबही आला नसल्याने नागरिकांमध्ये उद्रेग निर्माण झाला होता.
अश्याा दोषी आणि भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी व नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी कॉग्रेस व युवासेना या महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतर्फे १ जुन रोजी महानगरपालिकेच्या आवारात घागर फोडो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती युवासेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय ठाकूर यांनी आज ३० जुन रोजी आयोजित पत्रपरिषदेत केला.