महाकाली- भिवापूर परिसरातील नागरिकांना ४ दिवसापासून पाण्याची टंचाई, अमृत ठरली कुचकामी!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर महानगरपालिकेकडून पाणीटंचाई निवारण्यासाठी विविध उपायोजना राबवत असल्याचा.मनपाकडून बाता मारल्या जातात. सध्या चंद्रपूर शहराचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहेत.
रखरखत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण होणारी पाणीटंचाई मनपाच्या अमृत योजनेची पोलखोल करणारी ठरली आहे.
जवळपास सहा महिने होऊन मनपा प्रशासनाच्या जागी आता महानगरात महापौर, आणि प्रत्येक वार्डात नगरसेवकाची निवड झालेली आहे. अशाही परिस्थितीत चंद्रपूर शहरातील नागरिकांना पाण्यासाठी चार चार दिवस ताटकळत राहावं लागत आहे. यापेक्षा चंद्रपूर मनपा प्रशासनाचे दुर्दैव म्हणावे का? एकीकडे नागरिकांना नियमित शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका बोंबा मारत असते. मनपाच्या नियोजन शून्य, दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यात मनपा सक्षम नसल्याची दिसून येते.
मागील चार दिवसापासून महाकाली परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी नसल्याने या परिसरात होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यातही मनपाकडून देण्यात येणाऱ्या पाणी नागरिकांना एक दिवसाआड मिळतो.
त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजना, चंद्रपूरकरांना शुद्ध नियमित पाणी कधी मिळेल , याची उत्सुकता अजूनही चंद्रपूरकरांना आहेच. एकीकडे मनपा प्रशासन पाण्याच्या पुरवठासाठी शहरात हातपंप, टूबवेल, आणि ठिकठिकाणी नवीन हात पंप तयार केल्याचे सांगत असते.
मग त्या करोडो रुपयांच्या अमृत योजनेचे काय? असा प्रश्न आता चंद्रपूरकर विचारत आहेत.
चंद्रपूरकरांना पाणी नियमित न मिळणे म्हणजे मनपा प्रशासनाची पाणीपुरवठा योजना अशक्षम असल्याचे दिसून येते. मनपा प्रशासन चंद्रपूरकरांना नियमित व स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करून देण्याचे आश्वासने फोल ठरली आहेत की काय? असा प्रश्न आता चंद्रपूरातील नागरिक मनपा प्रशासनाला करीत आहे.
