स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही बेलगावात पाण्याची भीषण टंचाई! जल जीवन मिशन फक्त कागदावर?



स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही बेलगावात पाण्याची भीषण टंचाई!
जल जीवन मिशन फक्त कागदावर?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात येत असलेल्या बेलगावात भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. एकीकडे शासन जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावात नागरिकांना पाणी मिळावे यासाठी करोडो रुपयाची योजना राबवित आहे. मात्र ती आता कागदावरच आहे की काय? असा प्रश्न आता त्या भयानक पाणीटंचाई वरून दिसून येत आहे. गावातील नागरिकांना गावाबाहेर असलेल्या विहिरीवर बादलीने पाणी काढावे लागत आहे. तसेच या गावातील नागरिकाचे म्हणणे आहे की, गावात पीक पाणी सर्व सुविधा असून सुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यापेक्षा यापेक्षा आमचे दुर्दैव काय?



भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावं लागत आहे. यापेक्षा देशाची शुव्यवस्थितेची शोकांतिका काय असू शकते! सरकार अपयशी की, प्रशासनाने राबवलेली योजना कागदोपत्रीच, योजनेचा जागरिकांना भोपळा!
लोकप्रतिनिधी मात्र निवडणुकीच्या वेळेचा आश्वासन देतात, नंतर मात्र गावाकडे भटकूनही पाहत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. अशी विदारक परिस्थिती बेलगाव वासियांची आहे.
गावाबाहेर असलेली एकच विहीर असून बैल बंडीवार, छोटा हत्तीवर ड्ममध्ये पाणी भरून न्यावे लागत आहे. चंद्रपूर जिल्हा सध्या 46 अंशाच्यावर पारा उखाळा देत आहे. अशा तापमानात नागरिकास, जनावरास पाण्याची फार आवश्यकता असतांना प्रशासनाने या गावाकडे सक्षमदुर्लक्ष केल्याची बाब गावकऱ्यांनी बोलून दाखवली . स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही गावकऱ्यांना आजही विहिरीतून पाणी बादलीने काढून आणावी लागते. शासनाच्या जल जीवन मिशन योजना फक्त कागदावरच आहेत असा आरोपही गावकऱ्यांनी केला!