चंद्रपूरला मिळाले 'हात' झटकणारे पालकमंत्री ? प्रतिनिधीही राम भरोशे !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या पालकमंत्री आहेत का? असा गंभीर प्रश्न आता जिल्हा वाशियांना पडला आहे. जिल्ह्यातील पालकमंत्र्याचे दर्शन सना-वारालाच होत असते, असे जिल्हावाशियांचे म्हणणे आहे!
महाराष्ट्र सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार असताना. वेगळ्या जिल्ह्यातील आमदाराच्या माती पालकमंत्रीची जबाबदारी देऊन जणू काही चंद्रपूरकरावंर उपकारच केले?
जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण एक- एक महिना होत नाही! पालकमंत्री ज्या दिवशी येथील त्या दिवशी त्याचे स्विह सहायक पटेल त्यांचे सह्या घेऊन फक्त, जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रारी सुप्रूत करतात. एवढे करून मात्र हात झटकून मोकळे होतात. पालकमंत्र्याच्या मागे असणारे प्रतिनिधी उपस्थित राहत नाहीत. ते महिन्याचे वीस दिवस बाहेर असतात. नंदुरबारचे असल्याने ते तिकडेच असतात. त्यामुळे नागरिकांना वारंवार फेरफटका मारावे लागते.मात्र पालकमंत्र्याच्या दौरा असला की ते चंद्रपूरला येतात. तक्रारकर्त्यांनी अर्ज केलेल्या कारवाईचे काय? तर आम्ही संबंधित विभागाला पत्र देतो, बस एवढेच सांगतात. मग पालकमंत्र्यांची जबाबदारी काय? एवढेच काम पालकमंत्र्यांचे असेल तर, तक्रारकर्त्यांनी कुणाकडे दाद मागायची! जिल्ह्याचे पालक, पालकत्व सांभाळण्यास निष्क्रिय असतील तर, अशा पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचे पालकत्व सोडलेले बरे! असं त्यांनाही वाटतं! पण मजबुरीने ते पालकमंत्री पद जिल्ह्याचे सांभाळत आहेत हे त्यांनाही माहित आहे! कारण , जिल्ह्याच्या राजकारणातील नेत्यांच्या भानगडीत पडण्यापेक्षा, आपण वेगळे राहिलेले बरे ,असेच त्यांना वाटत असेल ! कारण चंद्रपुरात सुरू असलेल्या राजकीय वातावरणात वेळ मारून नेत असल्याचे पालकमंत्री दिसून येत आहे. तसेच जवळीक असलेले काही कार्यकर्तेच बोलून जातात!!
अलीकडे झालेल्या एका कार्यक्रमातून ते चांगल्या प्रकारे दिसूनही आले.
यापूर्वी पालकमंत्र्याच्या अनेक पत्रकार परिषदेत झाल्या त्यात अनेक प्रश्न पत्रकारांनी केले, कुठल्याही पत्रकाराचे समाधानकारक उत्तर देणे हे त्यांना कधी जमले नाही, बस मी विचारून सांगते! तसे कळवते! विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारून सांगते! आपण सांभाळून घ्या!
यापुढे काही सांगण्याचे टाळून वेळ मारून नेण्याचे यासारखे दुसरे काही दिसले नाही. म्हणून चंद्रपूरला मिळाले 'हात' झटकणारे पालकमंत्री ? अशी म्हणण्याची वेळ जिल्हा वाशियांवर आली?
आता तर चंद्रपूरकरांना वाटू लागली की, जिल्ह्याला पालकमंत्री आहेत का? काही असे म्हणतात "आपण पालकमंत्र्यांना पाहिलेत का?
अशा चंद्रपूरकरांच्या भावना समजून आता तरी पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देतील का?
