६८ वय असलेल्या कोकिळाबाईच्या जमिनीची अंमलबजावणीसाठी प्रशासनावर कोणाचा दबाव!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
बल्लारपूर येथील सर्वे क्रमांक १६७/३, १६७/ ४, आराजी १.५४,०.६५ ,एकर जागेचा ताबा मिळवण्यासाठी मागील अंदाजे अनेक वर्षापासून श्रीमती कोकिळाबाई बाळकृष्ण सलामे ६८,वय असलेल्या बल्लारशहा येथील आदिवासी महिला प्रशासनासोबत आपली जमीन नावावर करण्यासाठी सातत्याने प्रशासनाकडे लढत आहे.
सर्वपुरावे, आदेश असताना सुद्धा प्रशासन त्या जमिनीची अंमलबजावणी का करीत नाही, असा प्रश्न आज पत्रकार परिषदेतून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष शेखर पाटील, हरीश दुर्योधन, तेजराज मानकर, विलास बोरकर, जितू करमरकर, यास पदाधिकारी यांनी मांडली.
सर्व पुरावे हे आदिवासी महिला श्रीमती कोकिळाबाई सलामे यांचे बाजूने असताना, प्रशासन राजकीय पार्टीच्या नेत्याच्या दबावाखाली ती जमीन नावाने करीत नसल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून केला. आणि असेही म्हटले की संबंधित राजकीय नेत्याची, अतिक्रमण केलेली जागा, त्यावर बांधकाम असलेली जागा ही त्यांनी ठेवून द्यावी, उर्वरित खाली जागा त्या महिलेला प्रशासनाने अमलबजावणी करून त्यां महिलेच्या ताब्यात द्यावी. अन्यथा एक महिन्याच्या आत या महिलेची जमीन त्यांना स्वतःचे घराजवळच जमिनीचा ताबा मिळावा या साठी उपोषण करण्यात येईल अशी माहिती प्रशासन व पोलीस प्रशासना देण्यात येऊन उपोषण करण्यात येईल अशी माहिती आज पत्रकार परिषदेतून देण्यात आली.
