ओबीसी मोर्चा ! बुडत्याला काठीचा आधार! chandrapur obc morcha




ओबीसी मोर्चा ! बुडत्याला काठीचा आधार!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरामध्ये ओबीसी महामोर्चा चे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा ओबीसी इतर मागास प्रवर्गातील समाजातील जातींचा आपल्या हक्कासाठी मोर्चा काढण्यात आला होता.
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही सर्व ओबीसी समाज बांधवांची मागणी आहे. आज देशात जनावरांची ही गणना होते. परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षात ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना होत नाही. यासाठी ओबीसी बांधव वारंवार मोर्चे,आंदोलन करतात. परंतु असा प्रश्न आता निर्माण होतो की खरंच देशात ओबीसी समाज आहे का? ओबीसींना आरक्षणाची गरज आहे का? ओबीसीच्या आरक्षणाच्या स्वातंत्र्यावर गदा निर्माण झाली का? शैक्षणिक, राजकीय ओबीसीचे आरक्षण हिरावले गेले आहे का? आपल्याला आपल्या आरक्षणाचे हक्क हवे आहे का? गरज याची गरज
असताना आज ओबीसीला आरक्षण मिळत नाही! ही खेदाची बाब आहे! रस्त्यावर उतरताना ओबीसींना हजाराचा आकडा पार करता येत नाही! खरंच ओबीसी आहेत का? असा प्रश्न आज झालेल्या मोर्चा वरून दिसून येतो . जो नेता येतो तो, फोटो काढतो, व्हिडिओ काढून शेअर्स करतो.माध्यमातून आरक्षणाची भाषा करतो. बस त्याची जबाबदारी संपतो. आणि पुन्हा जैसे ते करून. हळूच एखाद्या कोपऱ्यातून आल्या पावली मार्ग निघण्याचा काढतो. मी मोर्चात असल्याचा दिखावा करतो.
एकीकडे ओबीसी समाज 50% , 60% वर पोहोचला असल्याची ओबीसी संघटना कडून वारंवार शासन दरबारी पाठपुरावा केला जातो. त्याची जात नियोजन गणना व्हावी अशी वारंवार मागणी करतो!
सर्व जातीतील ओबीसी समाजातील साडेचारच्या वर वेगवेगळ्या जातींना समाविष्ट करण्यात आले. जिल्ह्यात आज महामोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चात एकंदरीत ओबीसी समाजाची संख्या पाहता कुणाला लाजवेल अशी ओबीसी समाजाची संख्या होती. मोठमोठे दावे करण्यात आले होते. या मोर्चात दहा हजाराच्या वर ओबीसी समाज  आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरेल . हे सर्व दावे  फोल ठरले. 
चंद्रपुरात इतर समाजातील प्रवर्गातील विशेष मागास प्रवर्गातील विविध समाज संघटना एकत्र करून संयुक्त महामोर्चाचे आयोजन करण्याची वेळ आली, म्हणजे 'बुडत्याला काठीचा आधार' घ्यावा लागला असे म्हटले तर वांगे ठरणार नाही.
कारण जिल्ह्यात ओबीसीची संख्या ही 60% च्या वर असताना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरताना हजाराची संख्या पार करता येत नाही. मग खरंच ओबीसींना आरक्षणाची  आवश्यकता आहे का? हा प्रश्न आता फार भेडसावत आहे. एकंदरीत  ओबीसीची समाजाची जनगणना व्हावी! ही सर्वांनाच वाटत असताना!
ओबीसी समाजाची फार वाईट दयनीय अवस्था आपल्या हक्कासाठीच लढताना दिसून येते.
  महामोर्चात हजारोंच्या संख्येने  सहभागी  व्हावे असे आयोजक. आणि समाज संघटनाकडून  आव्हान करण्यात येतात. परंतु ते नेतृत्व कमी पडतं  असं मला वाटत नाही!  कारण की सर्वांची जबाबदारी असताना सुद्धा !'तुम लढो हम कपडे संभाळते! असे म्हणणारे समाजातील घटक आजही अस्तित्वात आहेत.
कारण ओबीसीच्या साडेचारशे च्या वर्ती जाती असून सुद्धा कुणालाही आरक्षण मिळावं असं काही वाटत नाही ?  कारण सर्वच 'आरत्या बिळाचे नागोबे  तयार झाले आहेत.
  यापूर्वीओबीसी समाजातील  समाविष्ट असलेल्या जातींचा  हा महामोर्चा  लाखोच्या संख्येने चंद्रपुरातच भव्यदिव्य निघाला होता. त्याची प्रचिती अख्या महाराष्ट्राने नव्हे तर देशानेही अवलंबिली होती! त्याचे पडसाद चंद्रपुरातून सुरू होऊन! अख्ख्या महाराष्ट्रात ओबीसी मोर्चाला सुरुवात झाली होती.
जिल्ह्यात ओबीसीची संख्या पाहता. खरंच इतर विशेष मागास प्रवर्गातील विविध  संघटनाची , राखीव प्रवर्गाच्या संयुक्त महामोर्चाची  खरंच ओबीसींना आवश्यकता होती का? ओबीसी समाजातील  प्रत्येक समाजातील एका व्यक्तीने सहभाग दर्शवला असता तरी, हा मोर्चा लाखोच्या संख्येने झाला असता! पण मलाच का त्याचे देणे? असे तर वाटत असेल ओबीसी समाजातील व्यक्तींना. तर हे असेच होणार?  एकंदरीत ओबीसी समाज खरंच झोपलेला आहे.
असे म्हणतात ते खरंच! कारण राजकीय नेते आपली पोळी भाजण्यापुरतेच  ओबीसी समाजाचा वापर करतात.
  ओबीसी समाजातील  विखुरलेल्या संघटनांनी  एकत्र येणे काळाची गरज आहे!  पण एकत्र येत नसतील तर मग,कुणाचातरी ईगो! मी पणा!  मी मोठा!  प्रत्येक वेळेस श्रेय घेण्याचे  दोदलेपणा बाहेर निघत , आणि हे समाजालाही कळत , की हे आपल्या स्वार्थासाठी लढतात ,की समाजासाठी लढतात. कुणाचे नेतृत्व करतात हे जोपर्यंत या सर्व गोष्टींचा समाजासमोर  ससे मिरा होत नाही. तोपर्यंत आता ओबीसी समाजाचा कुठल्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा हाच प्रश्न निर्माण होईल!
ओबीसी समाज एवढा दुबळा झाला की, आपल्या हक्कासाठी लढताना इतर  समाजातील  जातीधर्मातील  समाजाचा आधार घ्यावा लागतो. यापेक्षा ओबीसी समाजाचे दुसरे दुर्भाग्य काय असू शकते. एकीकडे आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, असे म्हणताना संघर्ष आणि लढताना मात्र, आम्ही कुबड्याचा आधार घेतो! यापेक्षा ओबीसीचे दुसरे दुर्दैव काय? बहुजन समाजाच्या हितासाठी , आणि समाजावर होणारे  अन्यायासाठी आज समाजाने वज्रमुठ बांधण्याची गरज आहे. पण ती वज्रमुठ ओबीसी समाजात दिसून येत नाही याची खंत ही या मोर्चातून दिसून आली. सावध व्हा, जागे व्हा, येणाऱ्या पुढच्या पिढीला वाचवा! नाहीतर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही! याचे भान ठेवा! आणि ओबीसी समाज जागा व्हा! तूर्तास एवढेच सांगतो.