विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
दिवसभर रंगली सुमधुर गीतांची मैफिल
विविध क्षेत्रातील मान्यवरांची एकच गर्दी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : विदर्भवादी ओबीसी नेते, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील जेष्ठ पदाधिकारी डॉ. अशोक जीवतोडे यांचा वाढदिवस आज (दि.२१) ला उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.
भरगच्च पार पडलेल्या या सोहळ्यात माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे, आमदार देवराव भोंगळे, माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार संजय धोटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, उपाध्यक्ष संजय डोंगरे, मानद सचिव आवेश पठाण, प्रभुजी देशपांडे, वसंतराव थोटे, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, गौरीशंकर पाराशर, मोहन दीक्षित, राहुल पूगलिया, दीपक पारेख, राजेंद्र वैद्य, प्रवीण पडवेकर, हरीश शर्मा, माजी प्राचार्य सुधाकर उमाटे, माजी प्राचार्य किशोर वाट, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष श्रीधर मालेकर, डॉ. नंदकिशोर खत्री, बंडू धोत्रे, एड. पी.एम. सातपुते, सचिन राजुरकर, नरेंद्र बोबडे, भास्कर ताजने, बिरजू पाझारे, नगराध्यक्ष प्रफुल चटकी, राजू बिल्लोरिया, जयसिंग गोहोकर, सुनील दहेगावकर, अनिल धानोरकर, विनोद दत्तात्रय, राहुल पावडे, रवि गुरुनुले, रवि लोणकर, सिनेट सदस्य संजय गोरे, डॉ. संभाजी वाडकर, प्राचार्य जनार्दन काकडे, प्राचार्य आसुटकर, आदी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात डॉ. जीवतोडे यांच्या समाजकारण, शिक्षण आणि ओबीसी हक्कांसाठीच्या कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थित शुभेच्छुकांनी त्यांच्या नेतृत्वगुणांचे, विदर्भाच्या प्रश्नांवरील अभ्यासपूर्ण भूमिकेचे, ओबीसी समाजातील प्रश्नांच्या लढ्याचे आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले.
सोबतच वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात गीतगायन कार्यक्रम आयोजित असल्याने दिवसभर सुमधुर गीतांची मैफिल रंगली होती.
कार्यक्रमस्थळी विविध संघटना, संस्था आणि समर्थकांकडून पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. अनेकांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी आपल्या मनोगतात डॉ. अशोक जीवतोडे यांनी वाढदिवसानिमित्त मिळालेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार मानत, समाजहित आणि बहुजनांच्या व ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी आपले कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
संपूर्ण कार्यक्रम उत्साह, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात पार पडला. उपस्थितांच्या मोठ्या प्रतिसादामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली.
