चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देशातील महागाईच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन



चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देशातील महागाईच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
देशभरातील जनतेवर महागाई लादल्यामुळे जनता महागाईच्या विळख्यात होरपडली जात असल्यामुळे महागाई नियंत्रणात आणण्यात मोदींचे सरकार अपयशी झाले आहे. यासाठी चंद्रपूर जिल्हा अधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले. त्यांनी महागाई विरोधात नारेबाजी केली. राज्यात लावल्या जात असलेल्या स्मार्ट मीटर बद्दल सरकारचा निषेधही केला.
एकीकडे देशाचे पंतप्रधान जनतेशी मन की बात करत सामान्य जनतेची दिशाभूल करत वाढत्या महागाईत कंबरडे मोडत आहे.
देशामध्ये पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढ भरमसाठ प्रमाणात केल्यामुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झालेले आहे .आपण गॅस 29 रुपयाने सरसकट वाढ केल्याने छोट्या व्यवसायिकावर एक प्रकारे अन्याय केलेला आहे .त्याचप्रमाणे देशांमध्ये पाच राज्याच्या निवडणुका संपल्यानंतर लगेचच आपण पेट्रोल आणि डिझेल च्या किमतीत आठ ते दहा रुपयांनी वाढ केल्यामुळे महागाईच्या वाढीमध्ये आपला हातभारच लागलेला आहे. आपण मन की बात मध्ये देशातील जनतेला अच्छे दिन के वादे करत असताना महागाईच्या खाई मध्ये आपण गोरगरीब आणि सामान्य जनतेला ढकललेलं आहे. असे म्हटल्यास काहीच वावगे ठरणार नाही. महिलांना आज पुन्हा चूल पेटवण्यास सरकारने मजबूर केले आहे.
आपल्याला खरोखरच गोरगरीब आणि सामान्य माणसाच्या जीवनाचा खऱ्या अर्थाने विचार करायचा असल्यास गॅस डिझेल पेट्रोल याची झालेली वाढ तात्काळ रद्द करून जनतेला दिलासा देण्याचे काम आपल्या हातून व्हावे असे जनतेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. महागाई कमी न झाल्यास तसेच डिझेल पेट्रोल आणि गॅस दरवाढ मागे न घेतल्यास येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे आज आंदोलनातून सौ. बेबीताई उईके शहर जिल्हाध्यक्ष,
जनार्दन गेडाम आदिवासी सेल अध्यक्ष,महेश काहीलकर, कामगार अध्यक्ष,अॅड.पि.बी. वाकुडकर, वकील सेल
विठल मस्की ओबीसी अध्यक्ष,सौ. नंदिनी गौरकार, महिला अध्यक्ष,बब्बूभाई इसा अल्पसंख्यांक अध्यक्ष,परब गिरडकर विध्यार्थी अध्यक्ष,सूरज चव्हाण विधानसभा अध्यक्ष,नंदा शेरकी ओबीसी महिला अध्यक्ष,दीपक कटकोजवार, उपाध्यक्ष,आनंद तिरानकर उपाध्यक्ष,अरविंद परचाके सचिव यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.