पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारा वर्षांच्या यशस्वी कार्यकाळ-सुधीर मुनगंटीवार
'सबका साथ, सबका विकास' सरकारचे प्रमुख धोरण
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाची पत्रपरिषदेत माहिती देताना मुनगंटीवार यांनी 'सबका साथ, सबका विकास' हे सरकारचे प्रमुख धोरण राहिल्याचे सांगितले. एकेकाळी नक्षलवादाने प्रभावित असलेला 'रेड कॉरिडॉर' आज विकास आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून त्याचे श्रेय केंद्र सरकारच्या धोरणांना आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाला जाते, असे ते म्हणाले. भारताने जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली असून देश आता अन्याय सहन करणारा नसून प्रत्येक आव्हानाला ठामपणे उत्तर देणारा बनला आहे, असेही त्यांनी नमूद केले. विकासाच्या माध्यमातून भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा अधिक मजबूत झाल्याचा दावा त्यांनी केला.
देशात अस्थिरता निर्माण करण्याच्या उद्देशाने सीजेपी( काक्रोज जनता पार्टी) या नव्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून प्रयोग केला जात असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला. युवकांना प्रोत्साहित करणे नव्हे तर भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधात हा पक्ष स्थापन करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या
दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात असली, तरी त्यामागे आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत असल्याचा दावा माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला. इराण-अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित भू-राजकीय तणावामुळे जागतिक इंधन बाजारावर परिणाम होत असल्याचे सांगितले.
नीट परीक्षेतील पेपर फुटी सारख्या घटना देशासाठी चिंताजनक असल्याचे मान्य करत सांगितले की, केंद्र सरकार परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तोच उपाययोजना करीत आहे. देशात विविध घटना होत असतात. त्यातील एक हा भाग हे त्यांनी नमूद केले.
१९७३ मध्ये अरब राष्ट्र आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात अवघ्या तीन महिन्यांत पेट्रोलच्या दरात सुमारे ६६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. रायबरेली येथील एका जाहीर सभेत खाडीतील संघर्षामुळे पेट्रोलचे दर नियंत्रणाबाहेर गेल्याची कबुली स्वतः इंदिरा गांधी यांनी दिली होती, असा दावाही त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम पी एम किसान समान निधी योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी करून शेतकरी कल्याण नाला प्राधान्य दिले. गरीब, शेतकरी, युवक आणि महिला हे सरकारच्या विकास धोरणाच्या केंद्रस्थानी असून 'सबका साथ, सबका विकास, विश्वास आणि सबका प्रयास' हे सरकारचे ब्रीद वाक्य असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मोदी सरकार के बारा वर्षे केवळ आकडेवारी ची कथा नसून व आत्मनिर्भर आणि विकसित भारत घडवण्याची प्रेरणादायी वाटचाल असल्याचे मत मांडले. देशाची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक भक्कम झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.अर्थव्यवस्थेमध्ये मजबूत होतंआता ब्रिटन मागे पडलं. आणि आपण चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा स्थान आहे.हे आपण आणि संकल्प तिसरी अर्थव्यवस्था आर्थिक महासत्ता म्हणून आपण या दृष्टीने आत्मनिर्भर भारत असेल.
गेल्या बारा वर्षात 25 कोटी नागरिक दारिद्र्यरेषेबाहेर आलेत. चार कोटीहून अधिक पक्की घरे उभारण्यात आली. 60 कोटी नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळाला. 75 कोटीहून अधिक लाभार्थ्यांना मुद्रा करून देण्यात आले. तीन कोटीहून अधिक महिलांना लखपती दीदी योजना सक्षम करण्यात आली. बारा कोटीहून अधिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली. सामाजिक सुरक्षा चा विस्तार आणि डिजिटल व्यवहारात फार मोठी वाढ झाली. नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्हा आज विकासाच्या आणि प्रगतीचे केंद्र बनले.
असे माजी मंत्री , आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले, यावेळी आमदार देवराव भोंगळे , चंदन सिंग चंदेल, हरीश शर्मा, महापौर संगीता खांडेकर, डॉ. मंगेश गुलवाडे, विवेक बोंढे, बीजभूषण पाझारे, राहुल पावडे, संध्याताई गुरनुले, यास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
