.. दे रे थोडा ! जिल्ह्यातील 'खर्रा' शौकिनांची मनधरणी!




.. दे रे थोडा ! जिल्ह्यातील 'खर्रा' शौकिनांची मनधरणी!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्राला अन्न व औषध प्रशासन विभागात आयुक्त तुकाराम मुंढे अशा शिस्तप्रिय अधिकाऱ्यांची वर्णी लागली. एफडीएच्या पदभार स्वीकारताच नेहमीप्रमाणे ॲक्शन मोडवर येत महाराष्ट्रातील संपूर्ण अवैध्य,खर्रा (मावा), तंबाखू, गुटखा, विक्री विरुद्ध धडक मोहीम सुरू केली. या धडक कारवाईचे पडसाद आता जिल्ह्यासह ग्रामीण भागातही पडत आहेत. सुगंधी तंबाखू, गुटखा माफियाचे धाबे दणाणले आहेत.
कधीकाळी पानठेल्यांसमोर खर्रासाठी लागणारी कतार, आता लुप्त झाली आहे. अगदी सहज आणि ऐच्छिक पान ठेवल्यावर मिळणारा खर्रा छुप्या मार्गाने वाढीव दराने आडोशात पिशवीतून मिळत आहे.
खुलेआम-विक्री जरी बंद असली तरी, तस्कराकडून उपलब्ध होत असलेला तंबाखू छुप्या मार्गाने आजही शहरात अस्तित्वात आहे.
मात्र आता दे रे थोडा ! अशी म्हणण्याची वेळ आली एवढेच! जिल्ह्यातील 'खर्रा' शौकिनाची मनधरणी आणि विश्वासातील ग्राहकांनाच प्लास्टिकच्या पिशवीत बांधून खर्रा पुरवला जातो.
या प्रशासनाच्या कळक कारवाईमुळे दिवसातून तीन चार खर्रा खाणाऱ्यांना आता मात्र दिवसातून एकदा, किंवा कुणाकडे उपलब्ध असलास दे रे थोडा! अशे म्हणून शौक पूर्ण करावा लागत आहे. असे सुरू राहिल्यास, या व्यसनकर्त्यावर थोडीफार कात्री लागेल. बाजारात पुरवठा कमी आणि मागणी प्रचंड अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे विक्रेतांनी ग्राहकाच्या असहाय्यतेचा फायदा घेत खऱ्याचे दर 40 ते 50 रुपया पर्यंत वाढविले. छुप्या मार्गाने येणाऱ्या सुगंधी तंबाखू वाढीव किमतीमुळे विक्रेत्यांनी मनमानी सुरू आहे.
आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कळक शिस्तीची, तुरंत होणाऱ्या कारवाईची धास्ती निर्माण झाली आहे . धडक मोहिमेमुळे पानठेले रिकामे, बंद दिसून येत आहेत.
शहरी भागासह ग्रामीण भागातही पान ठेवल्यावर विकणारा खर्रा तंबाखूचे साहित्य दिसेनासे झाले. काही दिवस अवकाळ पडलेल्या खऱ्याला छुप्या मार्गाने अनोख्या पद्धती शोधून विक्रेते विकत आहेत. ग्राहकही छुप्या मार्गाने 'मावा' घेऊन आपला शौक पूर्ण करत आहेत.
 एफडीएच्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी शोधला तरी सापडणार नाही अशी रणनीती खर्रा विक्रेत्यांनी आखली आहे. यात मरतो तो रस्त्याच्या कडेला, छोटे पानठेलेवाले किंवा किरकोळ विक्रेते यात भरडले जातात. मात्र मोठे   सुगंधित तंबाखू तस्कर,  खऱर्यासाठी लागणारी सुपारी, सुगंधित पान मसाला असे मुख्य एजंट, पुरवठादार  यांच्यावर आयुक्ताने म्हटल्याप्रमाणे 'मोकोका'  लागत नाही तोपर्यंत ही छुपी विक्री थांबणे कदापिही शक्य नाही.
 अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे तंबाखूजन्य पदार्थाच्या बेकायदेशीर विक्रीला जरी तात्पुरता लगाम लागला असला, तरी  काळया बाजारात होत असलेल्या विक्रीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे डोके वर काढतील आणि गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आता  या अवैद्य छुप्या व्यवसायात घुसतील अशी शक्यताही नाकारता येत नाही.
 आता या काळ्या बाजारातील गोरख धंद्यावर अन्न व औषध प्रशासन विभाग, आणि स्थानिक पोलीस कसे कंबरडे मोडतात  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.