मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तक्रारी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची संबंधित विभागाकडून अहवाल सादर करून केली जाते दिशाभूल ! !
गडपिपरी ते गोठणगाव येथे झालेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात चौकशी समिती नेमण्याची मागणी,
चौकशी समिती,तक्रारदार व गावकरी ,प्रसार माध्यमे यांच्यासमोर झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी.
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येत असलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत गडपिपरी ते गोठणगाव रस्त्याच्या बांधकावर संबंधित विभागाच्या कामासंदर्भात काम गुणवत्तापूर्वक, मोजमाप पुस्तके नुसार नसून त्या कामाची चौकशी करावी असा आक्षेप व तक्रार जिल्हाधिकार्यालय कडे वारंवार देण्यात आल्या. संपूर्ण कामाची चौकशी ही राज्य गुणवत्ता निरीक्षक यांच्यामार्फत
जिल्हा प्रशासनाकडून एक चौकशी समिती नेमावी, यासोबत तक्रारदार, गावकरी, आणि प्रसार माध्यमे यांच्या समक्ष त्या झालेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी वारंवार करण्यात येत असताना. मात्र संबंधित मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंते,अधिकारी जिल्हाधिकारी यांची वारंवार आपलाच अहवाल सादर करून दिशाभूल करीत आहेत.
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना उपक्रम राबवत असताना सर्वसामान्य जनतेने देखील अशा होणाऱ्या बांधकामावर लक्ष दिले पाहिजे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे पाच वर्ष मेंटेनन्स कंत्राटदाराला करावयाचा आहे, करिता जिल्ह्यात अशा प्रकारचे उपक्रम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबां तर्फे राबविण्यात येत असतील तर सर्व जनतेने त्यावर लक्ष देऊन कामाच्या गुणवत्तेबद्दल लक्ष देऊन पंतप्रधानाच्या ग्रामीण विकासाला चालना मिळावी हा उद्देश असला तरी, संबंधित विभागातील अभियंते, व कंत्राटदार यांच्या मलाईत रस्त्याचे वाटोळे झाल्याचे दिसून येते. म्हणून संबंधित विभागाने चौकशी समिती नेमून कामाची गुणवत्ता पुस्तके नुसार चौकशी केल्यास कामात झालेला भ्रष्टाचार उघड झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांसह, कंत्राटदारावर कारवाई करावी! अशी मागणी गावकऱ्यासह प्रसारमाध्यमांकडूनही करण्यात येत आहे.


