चंद्रपुरात उमेद द्वारा रानभाज्या महोत्सव
नागरिकांना व खवय्यांना सहर्ष निमंत्रण!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपुरात जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या उमेद कडून रानभाज्या महोत्सव दिनांक 25 जुलै ते 26 जुलै दरम्यान जुबली हायस्कूलच्या राणी हिराई उमेद मार्ट नवीन हॉल परिसरात आहे. वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 8.30 वाजता पर्यंत असून
या दोन दिवसीय रानभाज्या महोत्सवात जिल्ह्यातील बचत गटाकडून रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत.
निसर्गाने आपल्या आरोग्यासाठी अनमोल ठेवा, रानभाज्याच्या माध्यमातून आपल्याला सकस आयुर्वेदिक आहार मिळावा अशी सुविधा करून ठेवली आहे.
या रान भाजीमध्ये बांबूचे कोंब, कुड्याचे फुल, भाजी, नॅचरल मशरूम, गुळवेल, पातुर ची भाजी, अळूचे पान, काटवल, खापरखुटी भाजी, अंबाडी भाजी, तरोटा भाजी, तांदूळ भाजी, फासे ची भाजी, अशा अनेक वनस्पतीतील रानभाज्या उपलब्ध आहेत. नागरिकांनी खवय्यांना या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आव्हान उमेद कडून करण्यात येत आहे.
