कळप सोडून 'टस्कर' हत्ती परतला ! शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण



कळप सोडून 'टस्कर' हत्ती परतला ! शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर :जिल्ह्यातील सावली तालुक्यातील उमरी तलाव परिसरात पुन्हा एक टस्कर हत्ती दाखल झाला आहे. हा हत्ती सामदा-सोनापूर नदीमार्गे गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात आला. सध्या या हत्तीने सावली तालुक्यातील उमरी तलाव परिसरातील जंगलात ठिय्या मांडला आहे.या हत्ती पाठोपाठ कळपातील इतर हत्ती सुध्दा परत येण्याची शतक्या वर्तवली जात आहे.परिसरात हत्ती दाखल होताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील 2 महिन्यां पूर्वी 30 रानटी हत्तींच्या कळपाने उमरी तलाव क्षेत्रातील जंगलात ठिय्या मांडला होता. दि 1 जुलै ला इतर हत्ती वैनगंगा नदीला पार करून गडचिरोली जिल्ह्यात परत गेले. त्यातील तस्कर हत्ती सुद्धा परतीच्या मागावर असतांना त्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.
उमरी जंगल परिसरात 3 मोठे तलाव आणि घनदाट जंगल असल्यामुळे हत्तीनसाठी पोषक वातावरण आहे.कदाचित त्याच कारणामुळे हत्ती पुन्हा याच परिसरात परत आले असावे असा अंदाज वन विभागाद्वारे वर्तविला जात आहे.
खरीप हंगाम सुरू असतानाच हत्तींच्या आगमनामुळे पिकांवर मोठे संकट ओढवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.हत्तींच्या आगमनामुळे शेतजाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या जंगल परिसरात Pathari , Asola चक, उसरपार चक, उसरपार तुकूम, मंगरमेंढा, पालेबारसा, सायखेडा गांव आहेत.हत्तीच्या आगमनाने गावांतील सामान्य नागरिकांचेही दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे. सायंकाळनंतर बाहेर पडताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून गुरे चारणारे पशुपालक, जंगलातून सरपण किंवा वनउत्पादने गोळा करणारे ग्रामस्थ तसेच शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अतिरिक्त सावधगिरी बाळगावी लागत आहे. काही गावांमध्ये रात्रीच्या वेळी ग्रामस्थांनी स्वतःहून दक्षता पथके तयार करून हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. सावली वनविभागाकडून संयुक्तपणे हत्तींच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जात आहे. वनकर्मचारी आणि बचाव पथके प्रभावित भागात तैनात करण्यात आली असून गावागावांत दवंडी, ध्वनिक्षेपक आणि इतर माध्यमांतून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत.


वनविभागाकडून हत्तीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, संबंधित गावांमध्ये सतर्कतेच्या सूचना देण्यात येत आहेत. हत्ती दिसल्यास त्याला कोणत्याही परिस्थितीत डिवचू नये किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. तत्काळ वनविभाग अथवा स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी.

- विनोद धुर्वे, वनपरीक्षेत्र अधिकारी, सावली