शहरात वाहतुकीचा बट्ट्याबोळ, पण प्रशासकीय भवनात हेल्मेटची शक्ती ! वाहतूक पोलिसांची कळक कारवाई....!




शहरात वाहतुकीचा बट्ट्याबोळ, पण प्रशासकीय भवनात हेल्मेटची शक्ती !
वाहतूक पोलिसांची कळक कारवाई....!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरातील वाहतूक नियंत्रण शाखेत कडून प्रशासकीय भावनाच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी वाहनावर हेल्मेट परिधान न केलेल्या वाहनधारकावर कडक कारवाई करत आहेत. एकीकडे शहरांमध्ये वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. दुसरीकडे मात्र वाहतूक नियंत्रण शाखा हेल्मेट न घातलेल्या, वाहन चालकांची प्रशासकीय भवनात चालन करीत आहेत. शहरात वर्दळीच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्याकडे मात्र वाहतूक विभाग उघड्या डोळ्यांनी पाहते.
वाहतूक विभागाचे हाकेच्या अंतरावर असलेल्या ट्रॅव्हल्स वाल्यांना मात्र वाहतूक विभागाची मुबा मिळते! रस्त्यावर ट्रॅव्हल्स वाल्याची मनोपल्ली त्यांच्यावर कुठलीही कारवाई करताना वाहतूक विभाग दिसत नाही.
शहरात ऑटोवाल्याले वाटेल तिथे प्रवासासाठी  थांबून  कुठलाही विचार न करता  सरळ ऑटो थांबवतात. प्रवासी रस्त्यावर  दिसले तिथेच थांबवतात. अनेकदा मागून येणाऱ्या वाहनाचा अपघात होतो. उलट त्यांची मुजोरी  सुरू होते. शहरातील अनेक फूटपाटवर  अवैद्य वाहन  विक्रेते अतिक्रमण करून बसले आहेत. ते वाहतूक विभागाला दिसत नाही का?
 सर्व काही डोळ्यादेखत सुरू असताना मात्र वाहतूक विभागाच्या  फक्त प्रशासकीय भवनात हेल्मेटची  शक्ती का? असा प्रश्न मात्र आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
 शहरातील वाहतूकदारांसाठी हेल्मेटची शक्ती नाही का? शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनधारकांना  हेल्मेटची शक्ती असावी.
  प्रशासकीय भवनात येणाऱ्या कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांना हेल्मेटची सक्ती करून खरंच वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे का?
 या कार्यालयात येणारे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र येथे येताच  त्यांच्या खिशाला कात्री बसतो. हा नियम कर्मचाऱ्यांसाठी आहे की सर्वसामान्यांसाठी आहे. हाही प्रश्न नागरिकांना पडत आहे. वाहतुकीची व्यवस्था   व्यवस्थित करायचे असेल तर वाहतूक शाखेने शहरात लक्ष द्यावे व सुरळीत वाहतूक व्यवस्था व्हावी असे उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी होती.