भिवापूर - लालपेठ येथे १५६ रक्तदात्यांनी केले रक्तदान
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या देवा भाऊ जनकल्याण सप्ताह अंतर्गत भिवापूर येथे लालपेठ हनुमान मंदिराजवळ १५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. जनहितार्थ राबवलेल्या या उपक्रमाला फार मोठा प्रतिसाद लाभला.
चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनातून मोफत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रित्यर्थ भिवापूर वार्डातील अमोल शेंडे यांच्या नेतृत्वात वार्डातील 156 रक्तदात्याकडून रक्तदान करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते अमोल शेंडे त्यांनी सामाजिक कार्याचे महत्व सांगताना अशा उपक्रमामुळे गरजू नागरिकांना मोठा आधार मिळत असल्याचे सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता अमोल शेंडे,अरुण हजारे. मंगेश गौरकर. मनिष जुनघरे. उमेश गडाईट.शुभम राखडे. पिंटू गाऊत्रे. सागर बनकर .शुभम वानखेडे आकाश निकोडे. नमीत अमरोजवार. हसराज कळस्कर. राज बनकर. हिमांशू करकाडे, लालपेठ भिवापूर परिसरातील नागरिकांनी विशेष सहकार्य केले.
:
