दिल्लीतील विद्यार्थी लाठीहल्ल्याचा निषेधार्थ, उद्या चंद्रपुरात महाविकास आघाडी व सामाजिक संघटनांचा 'तिरंगा जन आक्रोश रॅली '! chandrapur





दिल्लीतील विद्यार्थी लाठीहल्ल्याचा निषेधार्थ,
उद्या चंद्रपुरात महाविकास आघाडी व सामाजिक संघटनांचा 'तिरंगा जन आक्रोश रॅली '!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूरः

दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या महिनाभरापासून विविध परीक्षांच्या पेपर फुटी विरोधात आंदोलन सुरू असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी विद्यार्थी आग्रही आहेत. परंतु सरकारने विद्यार्थ्यांची मागणी मान्य न करता उलट विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या, दिनांक 24 जुलै 2026 रोजी दुपारी ठीक 3:00 वाजता शिवाजी चौक येथून
चंद्रपूर शहरात एका भव्य 'तिरंगा जन आक्रोश रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. महाविकास आघाडी, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सामाजिक, राजकीय आणि विविध प्रमुख संघटनांच्या वतीने या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे, अशी माहिती महाविकास आघाडी सर्व पदाधिकारी यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली.
दिल्लीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस प्रशासनाने केलेल्या अमानुष लाठीहल्ल्यामुळे देशभरातील तरुणांमध्ये आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीचा आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संघटना एकवटल्या आहेत. या 'तिरंगा जन आक्रोश बाईक रॅली'मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी, तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हाहन करण्यात येत आहेत. हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने केले जाणार असून, रॅलीदरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था आणि वाहतूक नियमांचे चोख पालन केले जावे असे आवाहन महाविकास आघाडी व इतर सामाजिक संघटना यांनी दिली आहे. "हा लढा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व स्वाभिमानी 'नागरिकांनी, तरुणांनी आणि कार्यकर्त्यांनी उद्या दुपारी 3:00 वाजता या 'तिरंगा जन आक्रोश बाईक रॅली'त मोठ्या संख्येने सहभागी व्हावे," असे आव्हान महाविकास आघाडी, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड व इतर सामाजिक संघटना, विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. ,