जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू विक्री उठली ? सर्रास प्रत्येक पान ठेल्यावर खुली विक्री!




जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू विक्री उठली ?
सर्रास प्रत्येक पान ठेल्यावर खुली विक्री!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आपल्या हातात या विभागाची सूत्र हाती घेताच राज्यात सर्वत्र दहशत निर्माण झाली होती, ती काही ठिकाणी कायम सुद्धा आहे!
मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य व औषध प्रशासन विभागाने तसेच पोलीसानी आयुक्ताच्या आदेशाला केराची टोपली दाखवली की काय? असे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्रीला अघोषित परवानगी मिळाली अशी स्थिती सध्या शहरातील सर्व पान टपरीवर सुरू आहे. जिल्ह्यात नवीन पोलीस अधीक्षक आयुष्य नोपानी यांनी पदभार सांभाळताच दोन महिन्यापूर्वी प्रतिबंधित सुगंधी तंबाखू विक्रेत्या विरुद्ध जिल्ह्यात कळक कारवाईचे शस्त्र उगारले होते. जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू विक्रेत्या विरुद्ध मिनी मकोका लावला. शहरातील सुगंधी तंबाखू विक्रीला बऱ्याच पैकी आळा बसला होता. पान ठेलेवाले आडोशाला थैलीत  खर्रा (मावा) भरून   वाढीव दराने ग्राहकांना विकत होते. मात्र  मागील  20 दिवसापासून  पुन्हा सुगंधित तंबाखू विक्रेत्यांनी  बिळातून डोके वर काढले. आता सध्या शहरात सर्रासपणे विक्री सुरू असून, जशी काही जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूवरील विक्री उठली? जसे की अघोषित परवानगीच मिळाली अशी स्थिती आहे. सुगंधी तंबाखू तस्करांनी पुन्हा आपला व्यवसाय संघटितपणे सुरू केला आहे. त्यामुळे अन्य व औषध  प्रशासन व पोलिसांच्या भूमिकेबाबत मोठा संशय व्यक्त केला जात आहे.
 शहरात  दबक्या आवाजात अशी  चर्चा सुरू आहे की, पोलीस प्रशासन आणि अन्न प्रशासन विभाग यांच्याशी  तंबाखू विक्रेत्यासोबत कान फुसणी करून  तस्करांनी दोस्तीचा हात समोर करून  आपले  जाळे पुन्हा पसरविले आहे. म्हणून बंद झालेल्या पानठेल्यावर  सर्रास सुगंधी तंबाखू चा मावा   मिळत आहे.  जिल्ह्यातील नागरिकांना अधीक्षक आयुष नोपानी यांनी  ज्याप्रमाणे दोन तंबाखू विक्रेत्याविरुद्ध मिनी मकेका लावला होता. तंबाखू तस्करांचे कंबरडे  मोडले होते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या आशा  पल्लवीत झाल्या होत्या, की जिल्ह्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखूवर आळा बसेल,
  पण त्यांनी आशेला, निराश करीत, वीस दिवसानंतर पुन्हा सुगंधी तंबाखूची सर्रासपणे विक्री सुरू आहे. तंबाखू तस्करांना कुठलीही भीती राहिलेली नाही, अशीही चर्चा आहे की, संबंधित विभागाकडून  कारवाई न करण्यासाठी 'मॅनेज' झाल्याचे  बोलले जात आहे. मिनी मकोका लागलेल्या आरोपींना  हायकोर्टातून दिलासा मिळाल्यानंतर   
 जिल्ह्यात सुगंधी तंबाखू विक्री जशी ती झाली आहे. मिळेल त्या  पानठेले वाल्याकडे सर्रास विक्री चालू आहे.
  जिल्ह्यात सुगंधी तंबाखू विक्रीचे  मोठे राकेट सक्रीय आहे. संघटितपणे हा व्यवसाय केला जातो. त्यामुळे पोलिसाना व अन्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना  सर्व तस्करांचे  अड्डे माहित असताना सुद्धा कारवाई होत नाही. प्रतिबंधित तंबाखू विक्रीमुळे  युवकांना, तसेच गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांना यामुळे बळ मिळत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान,जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू  विक्री उठली ? की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.