सिएसटीपीएसच्या रिजेक्ट कोल गेट रस्त्याची दुरुस्ती न केल्यास बैलबंडी मोर्चा काढून तीव्र आंदोलनाचा इशारा
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
सिएसटीपीएसच्या अखत्यारितीत रिजेक्ट कोल गेट ते आवंठा डॅम जाणाऱ्या रस्त्याने मोठया प्रमाणात फ्लॉय अॅशची टँकर कॅप्सुल वाहनाने वाहतुक होत असते. फ्लॉय अॅश या अवजड वाहनाने हा रस्ता उखडला असुन चिखलमय तसेच रस्त्यावर मोठमोठाली खड्डे पडली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजुने २५ ते ३० शेतकऱ्यांची शेती आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी खडयामुळे अडचण होत असते. खडयात पाणी साचत असल्याने शेतकऱ्यांचे अपघात होत असतात. खराब रस्त्यामुळे शेती करतांना अडथळा निर्माण होऊन शेतकऱ्यांचे नुकसाने होत आहे. याला पूर्णवता कारणीभुत सिएसटीपीएसची राख वाहतुक आहे व अवजड वाहन राख वाहतुकीने खराब होणारा रस्ता आहे. गेल्या ३ वर्षापासून सिएसटीपीएस प्रशासनाला शेतकरी निवेदन देत आहे. मात्र शेतकरी विरोधी सिएसटीपीएस प्रशासनाने अज्ञाप कोणतेही पाऊल रस्ता दुरूस्तीसाठी उचलले नाही. राज्यशासन एकीकडे संद-टग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊन त्यांना मदत करत आहे तर दुसरीकडे राज्यशासनाचा एक भाग असलेले सिएसटीपीएस प्रशासन शेतकऱ्यांना संकटात ढकलुन त्यांचे नुकसान करीत आहे. हि वाब संतापजनक आहे. याची दखल सिएसटीपीएस प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी .असे निवेदन मुख्य अभियंता यांना देण्यात आले.
सिएसटीपीएस प्रशासनाने रस्ता दुरूस्ती बाबत काही कारवाई न केल्यास येत्या ३० दिवसात संपूर्ण शेतकऱ्यासह बैलबंडी मोर्चा सारखे तिव्र आंदोलन करून रस्ताबंद केला जाईल व अॅश वाहतुक रोखल जाईल. यातून सिएसटीपीएस प्रशासनाची शेतकरी विरोधी भुमिका जणतेसमोर आणली जाईल असा इशारा सदर निवेदनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. निवेदन देण्यासाठी
विक्रात सहारे युवासेना जिल्हा प्रमुख शिवसेना चंद्रपूर
श्री. राजेश नायडू शिक्षण सेना,अमोल मेश्राम कंत्राटी कामगार सेना शिवसेना ,सुरेशा पचारे माजी नगरसेवक, शिवसेना यांची उपस्थिती होती.
