दे.गो. रैयतवारी सर्वे नंबर १०७ मधील ५०० एकर सरकारी जमिन धनधांडग्याच्यां घशात !
शासनाचा अंदाजे पंचवीस हजार करोडांचा महसूल पाण्यात ...!
तलाठी विनोद खोब्रागडे यांचा सणसणीत आरोप...!
जिल्हाधिकारी या प्रकरणाला गांभीर्याने घेतील का?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
देवई गोविंदपूर रै हे गाव मूळचे रैयतवारी आहे: सर्वे नं.१०७ हा पूर्वी सरकारी होती. त्यात 497.93 हे.आर जमीन म्हणजे जवळपास अंदाजे ५०० एकर सरकारी जमिन धनधांडग्याच्यां घशात !
ही जमीन सरकारी असून या जमिनीवर त्यात सर्वे नं.१०७/६५ पर्यत मूळ पोटहिस्से पडण्यात आलेले आहे. अशी माहिती आज पत्रकार परिषदेतून तलाठी विनोद खोब्रागडे यांनी दिली.
त्या जमिनीत जवळपास 65 मूळ पोट हिस्से पाडण्यात आले असून त्यातील सात हिस्सेदार यांच्यावर रामनगर पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद करण्यात कर नोंद करण्यात आली असल्याची माहिती सांगलीतली. बाकीचे पोट हिस्सेदार यांची यादी तयार असून, त्यांच्याही पोट हिश्यातील जमिनीची माहिती लवकरच समोर येईल असे त्यांनी सांगितले,
त्यात पोटहिस्ते पडलेले आहे. सर्वे नं१०७ हा पूर्वी reure एकर चा होता. त्यात वाटप करण्यात आले त्यामूळे एवढ्या क्षेत्राचा मेळ घेणे व क्षेत्रात अदलाबदल करणे इष्ट होणार म्हणून त्या पोटहिस्स्याची जमीन परिवर्तित करून परीवर्तीत सर्वे नंबरचे क्षेत्र बदलविता येणार नाही.
परंतू क्षेत्र तफावत असल्यामुळे पोटहिस्सा कायम करण्यात आलेला नाही. सदर सर्वे कमांक १०७/१ ख पैकी क्षेत्र १.२० व १.१२ असे वेगवेगळे परावर्तीत व अकृषक म्हणून ७/१२ मध्ये दर्शविण्यात आले आहे. मोजणी नकाशात वहिवाटीप्रमाणे नावे व क्षेत्र दर्शींवेण्यात आले आहे.
ही सर्रास शासनाची आजच्या मूल्यमापनानुसार अंदाजे 25 ते 30 हजार करोड रुपयाचा महसूल पाण्यात गेले आहेत.
माहीतिच्या अधिकारात दिनांक 06/06/2016 रोजी संपूर्ण फेरफार पनजी व सातबाऱ्यासह तसेच आदेशासह माहीती मिळविली त्यावरून हा सर्व प्रकार बोगस बनावट दस्तऐवजच्या आधारे गैरअर्जदार यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून समान उद्देश साध्य करण्याकरीता सरकारी जागेची 10.48 हेक्टर आर अर्थात 25 एकर जागेची आर्थीक व्यवहार करून विल्हेवाट लावली व शासनाची फसवनूक केली तसेच त्यांनी मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची सूद्दा फसक्नूक केली असल्याचे माझे निर्दशनात आल्याने मी त्यांच्या वर कार्यवाही करिता वारंवार रामनगर पोलीस ठाण्यात व आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. असे त्यांनी सांगितले असून यामध्ये श्री मधुकर विश्वनाथ खांडरे यांनी दि. 19/11/1968 रोजी, काशिनाथ गणपत, विठ्ठल यांच्या पासून 4000/रूपयात सर्वे नं 107/1ड हेक्टर आर 9.76 एकर (3.94 हेक्टर) सारा 275.00 विकत घेतली. दि. 04/10/1978 रोजी त्यांनी आपसी वाटणीपत्र 3.50 पैश्याचा स्टॅपवर ऑन रजिस्टर आपसी वाटणीपत्र केले व त्यात पार्टी क्रमांक 01) सूधाकर विश्वनाथ खांडरे, 0.80 हेक्टर आर, पार्टी क्रमांक 02) सागर विश्वनाथ खांडरे, 0.80 हेक्टर आर, पार्टी क्रमांक 03) विनोद विस्वनाथ खांडरे, 0.80 हेक्टर आर, पार्टी क्रमांक 04) किशोर मधूकरराव खांडरे, 0.74 हेक्टर आर व पार्टी क्रमांक 05) शैलेद्र मधूकरराव खांडरे 0.80 हेक्टर आर अशा प्रकारे 3.94 हेक्टर आर जागेची आपसी वाटणीपत्र केले दि. 4/10/1985 रोजी फेरफार क्रमांक 799 नूसार आपसी वाटणीपत्राप्रमामे फेरपार घेम्यात आली व दि.01/11/1985 रोजी मंडळ अधिकाऱ्यांनी ते प्रमानित केली. दि 9/4/1991 रोजी त्या संपूर्ण जागेचा लेआउट नकासा तयार करून 102 प्लॉट पाडण्यात आले.
या लगतच्या जमीनीच्या मोजण्या झाल्या असून त्या अकृषक मध्ये परावर्तीत देखील झालेल्या आहेत. लगतच्या जमिनीचे मोजणीचे संबंधात तफावतीबाबत कोणत्याही तकारी प्राप्त झालेल्या नाही.
पुर्नमोजणीच्या नकाशाप्रमाणे व हल्ली वहिवाटीप्रमाणे क्षेत्रात तफावत नाही. परंतू मुळ नकाशा व मौका याच्यात उत्तरेकडील बाजूस थोडी तफावत आढळून येत आहे. तरी सदरची दुरूस्ती हल्ली कबजेवहिवाटीचे क्षेत्र व हद्द आणि पुर्नमोजण नकाश्याची हद्द कायम ठेवून दुरूस्ती करण्यात आली आहे.
या सर्वे नंबर 107 मधिल अंदाजे,५०० एकर सरकारी जमिनीच्या घोटाळा बाहेर आल्यास शासनाला जवळपास 25000 करोड च्या वर महसूल प्राप्त होईल. असे तक्रार करते तलाठी विनोद खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. मात्र 'कुंपणच शेत खात असेल तर,कारवाई करेल कोण!
